Rani Mukerji हिला डेट करण्यासाठी आदित्य चोप्राने घेतली ‘या’ व्यक्तीची परवानगी; थक्क करणारी ‘प्रेम कहाणी’

आदित्य चोप्रा विवाहित असताना देखील 'या' व्यक्तीने दिली राणी मुखर्जीला डेट करण्याची परवानगी; चोप्रा कुटुंबाला मान्य नव्हतं दोघांचं नातं, पण...

Rani Mukerji हिला डेट करण्यासाठी आदित्य चोप्राने घेतली 'या' व्यक्तीची परवानगी; थक्क करणारी 'प्रेम कहाणी'
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 11:53 AM

मुंबई : बॉलिवूड कलाकार त्यांच्या कामामुळे तर कायम चर्चेत असतात. पण झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य देखील चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतं. बॉलिवूडमध्ये कोणत्या कलाकाराचं नाव कोणसोबत सोडलं जाईल याबद्दल काहीही सांगता येत नाही.. ९० च्या दशकातील सेलिब्रिटी आता त्यांच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या आयुष्यात खास व्यक्तींची एन्ट्री झाली… काही सेलिब्रिटींसाठी त्यांचं प्रेम मिळवणं सोपं होतं, पण काहींसाठी मात्र प्रचंड कठीण… अभिनेत्री राणी मुखर्जी आणि निर्माते आदित्य चोप्रा यांची प्रेम कहाणीमध्ये अनेक ट्विस्ट आले.. आज आदित्य चोप्रा याचा वाढदिवस आहे… त्यामुळे जाणून घेवून निर्मात्याच्या आयुष्यात प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री कशी झाली…

आदित्य चोप्रा याच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्याचा जन्म २१ मे १९७१ साली मुंबई याठिकाणी झाला. प्रसिद्ध निर्माते यश चोप्रा यांचे पूत्र आदित्य चोप्रा इंडस्ट्रीमधील फार मोठं नाव आहे.. आदित्य चोप्रा यांनी बॉलिवूडला असंख्य हीट सिनेमे दिले आहेत. आजही त्यांच्या सिनेमांची चर्चा चाहत्यांमध्ये तुफान रंगलेली असते.

हे सुद्धा वाचा

सिनेमाची निर्मिती करणाऱ्या आदित्य याची ‘प्रेम कहाणी’ देखील प्रचंड फिल्मी आहे. राणी मुखर्जी हिच्यासोबत आदित्य चोप्रा याची केमिस्ट्री प्रचंड खास आहे. आदित्य आणि राणी यांची पहिली भेट २००२ साली प्रदर्शित झालेल्या ‘मुझसे दोस्ती करोगे’ सिनेमा दरम्यान झाली. ‘मुझसे दोस्ती करोगे’ सिनेमाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली होती.

‘मुझसे दोस्ती करोगे’ सिनेमा हीट झाल्यानंतर २००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘विर झारा’ सिनेमाच्या माध्यमातून राणी आणि आदित्य यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली. सर्वत्र फक्त आणि फक्त राणी आणि आदित्य यांच्या लव्हस्टोरीची चर्चा होती. दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट देखील केलं.

रिपोर्टनुसार, आदित्य याच्यासाठी राणी जेवणाचे डब्बे देखील आणायची. पण आदित्य चोप्रा याच्या कुटुंबाला ही गोष्ट खटकत होती. कारण आदित्य चोप्रा तेव्हा विवाहित होता. पहिली पत्नी पायल खन्ना हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर आदित्य चोप्राने राणी मुखर्जीला डेट करण्यास सुरुवात केली होती, असे म्हटले जातं.

पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतर आदित्य राणीच्या घरी गेला आणि तिच्या आई-वडिलांकडून अभिनेत्रीला डेट करण्याची परवानगी घेतली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर राणी आणि आदित्य यांनी २०१४ मध्ये गुपचूप लग्न केलं. लग्न झाल्याचा खुलासा आभिनेत्री २२ एप्रिल २०१४ मध्ये केला… आदित्य आणि राणी यांना एक मुलगी देखील आहे.. राणी तिच्या कुटुंबासोबत आता आनंदी आयुष्य जगत आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.