महागड्या गाड्यांचा शोक, एका सिनेमासाठी घेते गडगंज मानधन, ‘या’ अभिनेत्रीची नेटवर्थ जाणून व्हाल थक्क

झगमगत्या विश्वात फक्त अभिनेतेच नाही तर, अभिनेत्रींकडे देखील गडगंज संपत्ती, 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची संपत्ती थक्क करणारी... ती आहे बॉलिवूडची 'पॉव्हरफूल' अभिनेत्री...

महागड्या गाड्यांचा शोक, एका सिनेमासाठी घेते गडगंज मानधन, 'या' अभिनेत्रीची नेटवर्थ जाणून व्हाल थक्क
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 11:29 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये फक्त अभिनेतेच नाही तर अनेक अभिनेत्री देखील गडगंज संपत्तीच्या मालक आहेत. अभिनेत्रींनी स्वतःची जिद्द आणि मेहनतीच्या बळावर बॉलिवूडमध्ये भक्कन स्थाव निर्माण केलं आणि चाहत्यांच्या मनावर आज झगमगत्या विश्वातील अभिनेत्री राज्य करत आहेत. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा. अनुष्का शर्मा हिने अनेक सिनेमांमध्ये काम करत चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. बॉलिवूडची ‘पॉव्हरफूल’ अभिनेत्री म्हणून अनुष्का शर्मा हिची ओळख आहे. अनुष्का शर्मा हिने ‘रब ने बना दी जोडी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनुष्काने कधीही मागे वळून पाहिलं नाही. पहिल्या सिनेमातून प्रेक्षकांना अनुष्काला भरभरुन प्रेम दिला. आज अभिनेत्रीचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस आहे. शिवाय अभिनेत्री रॉयल आयुष्य जगते. आज अनुष्काच्या वाढदिवसा निमित्त अभिनेत्रीच्या नेटवर्थबद्दल जाणून घेवू.

गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री झगमगत्या विश्वापासून दूर आहे. लग्न आणि मुलीचा जन्म झाल्यानंतर अभिनेत्री अभिनयापासून दूर आहे. पण अनुष्काच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत अनेक सिनेमे बनले आहेत ज्यांनी चांगली कमाई देखील केली. अनुष्का स्वतः तिच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनलेल्या सिनेमांचं प्रमोशन करताना दिसते. याशिवाय ती अनेक जाहिरातीही शूट करते. अभिनेत्रीच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर तिच्याकडे एकूण 256 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

अभिनेत्री एका सिनेमासाठी गडगंज मानधन घेते. रिपोर्ट्सनुसार, अनुष्का एका सिनेमासाठी सुमारे 15 कोटी रुपये घेते. गेल्या काही वर्षांपासून अनुष्का मोठ्या पडद्यापासून दूर आहे, पण तरी देखील तिच्या संपत्तीमध्ये घट झालेली नाही. अभिनेत्री ब्रँड एंडोर्समेंट आणि इतर गुंतवणूकीतून पैसे कमवते. तिच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये नफा कमावणाऱ्या सिनेमांमध्ये अनुष्का शर्माचाही मोठा वाटा आहे.

अनुष्का शर्माकडे अनेक आलिशान कार आहेत. ऑटो टेक पोर्टलनुसार, अभिनेत्रीकडे रेंज रोव्हर वोग आहे. या कारची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये आहे. याशिवाय तिच्याकडे रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी आहे ज्याची किंमत 2 कोटी 75 लाख रुपये आहे. याशिवाय तिच्याकडे 1.34 कोटींची Audi Q8 आणि 2.46 कोटींची BMW 7 सीरीजची कार आहे. इतकेच नाही तर अनुष्का हिच्याकडे Bentley Flying Spur देखील आहे ज्याची किंमत 3.21 कोटी आहे.

अभिनेत्री एका कपड्यांच्या ब्रँडची मालक देखील आहे. तिच्या ब्रँडचे नाव NUSH आहे आणि तिला स्वतःला त्याचे अॅडशूट करायला आवडतं. याशिवाय तिच्याकडे काही अपार्टमेंटही आहेत. सध्या सर्वत्र अनुष्का शर्मा हिच्या संपत्तीची चर्चा रंगत आहे.

अभिनेत्री पती विराट कोहली आणि मुलही वामिका कोहली यांच्यासोबत जुहू येथे एक अपार्टमेंटमध्ये राहते. त्याचं महिन्याचं भाडं तब्बल 2.76 लाख रुपये आहे. अनुष्का शर्मा ही इंडस्ट्रीतील दमदार अभिनेत्रींपैकी एक आहे. कुटुंबासोबत अभिनेत्री अनेकदा परदेशात फिरायला देखील जाते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.