Katrina Kaif हिला आयुष्यात वडिलांचं प्रेम मिळालंच नाही; खंत व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली…

लेक आणि वडिलांचं नातं अत्यंत घट्ट असतं... पण कतरिना कैफ हिच्या आयुष्यात वडिलांचं प्रेम नव्हतंच..., वडिलांबद्दल असं काय म्हणाली अभिनेत्री? सध्या सर्वत्र कतरिनाच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Katrina Kaif हिला आयुष्यात वडिलांचं प्रेम मिळालंच नाही; खंत व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली...
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 12:37 PM

मुंबई | 16 जुलै 2023 : वडील आणि लेक हे नातं जगातील इतर नात्यांपैकी फार वेगळं आहे. वडील आणि लेकीचं नातं हे फार वेगळं आहे. दोघे कितीही भांडले तरी एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. वडिलांना थोडं जरी काही झालं, तर लेकीच्या डोळ्यात लगेच पाणी येत… मुलीच्या आयुष्यातील वडिलांची जागा कोणीच घेवू शकत नाही. पण काही मुलींच्या आयुष्यात वडिलांचं प्रेमच नसतं. असंच काही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासोबत झालं आहे. कतरिना कैफ हिला वडिलांचं प्रेम कधीच मिळालं नाही. अभिनेत्री लहान असतानाच कतरिनाच्या आई – वडिलांचे मार्ग वेगळे झाले. कतरिनाचा सांभाळ फक्त तिच्या आईने केला. कतरिना कायम तिच्या आईसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

एका मुलाखातीत अभिनेत्री वडिलांबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. शिवाय आयुष्यातील वडिलांचं महत्त्व देखील अभिनेत्रीने सांगितलं होतं. कतरिना म्हणाली होती की, ‘माझ्या आईने माझा सांभाळ केला. जेव्हा मी माझ्या मित्रांना त्यांच्या वडिलांसोबत वेळ व्यतीत करताना पाहायची तेव्हा मला वाईट वाटायचं. पण आता कोणतीही तक्रार नाही. माझ्याकडे जे काही आहे त्यासाठी मी देवाचे आभार मानते…’

कतरिनाच्या हिच्या वडिलांचं नाव मोहम्मद कैफ असं आहे. कतरिना लहान असानाच अभिनेत्रीच्या आई – वडिलांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कतरिना हिला पाच बहिणी आणि एक भाऊ आहे. तिच्या भावाचं नाव सेबस्टियन टरकॉटे असं आहे. कतरिना कायम तिच्या भावंडांसोबत आनंदी असते. अभिनेत्री कायम तिच्या भावंडांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

कतरिना कैफ हिचं पूर्ण कुटुंब लंडन याठिकाणी राहतं. पण कतरिना अभिनेत्री व्हायचं स्वप्न घेवून भारतात आली. तिने मॉडलिंग पासून करियरची सुरुवात केली. कतरिनाने २००३ मध्ये ‘बूम’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ज्यानंतर अभिनेत्री ‘सरकार’ सिनेमात दिसली.

पण अभिनेताला सलमान खान याच्यासोबत स्क्रिन शेअर केल्यानंतर कतरिना कैफ हिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. ‘मैंने प्‍यार क्‍यों किया’ सिनेमातून अभिनेत्रीचं नशीब चमकलं. त्यानंतर कतरिना हिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आज कतरिना बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

कतरिना लवकरच अभिनेता सलमान खान याच्यासोबत ‘टायगर ३’ सिनेमात दिसणार आहे. सध्या सर्वत्र कतरिना कैफ हिची चर्चा रंगत आहे. चाहते देखील ‘टायगर ३’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत..

Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....