Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Rashmika Mandanna | ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदनाचेही तुटले होते हृदय, ‘या’ अभिनेत्यासोबत मोडला साखरपुडा!

‘नॅशनल क्रश’ बनून लाखोंची मने जिंकणाऱ्या रश्मिका मंदनाचा (Rashmika Mandanna) आज 25वा वाढदिवस आहे. रश्मिकाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केले जातात.

Happy Birthday Rashmika Mandanna | ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदनाचेही तुटले होते हृदय, ‘या’ अभिनेत्यासोबत मोडला साखरपुडा!
रश्मिका मंदना
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 10:29 AM

मुंबई : ‘नॅशनल क्रश’ बनून लाखोंची मने जिंकणाऱ्या रश्मिका मंदनाचा (Rashmika Mandanna) आज 25वा वाढदिवस आहे. रश्मिकाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केले जातात. दक्षिणात्य मनोरंजन विश्वात रश्मिका आधीपासूनच सुपरहिट होती, परंतु आता संपूर्ण जगभरात तिचे चाहते तयार झाले आहेत. आतापर्यंत रश्मिकाने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का की, रश्मिका तिच्या पात्रांव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली होती (Happy Birthday Rashmika Mandanna break up story of Rashmika).

2017मध्ये प्रदर्शित झालेला रश्मिकाचा पहिला चित्रपट ‘किरक पार्टी’ चांगलाच गाजला. या चित्रपटातील अभिनेता रक्षित शेट्टीशी रश्मिकाने साखरपुडा देखील केला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांचे प्रेम जमले. दोघांनीही लगेच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे दोघांनी लगेच साखरपुडादेखील उरकला होता. मात्र, त्यानंतर दोघांनी अचानक आपलं ठरलेलं लग्न मोडलं.

रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाने रक्षितसोबतचा साखरपुडा मोडायला अनेक कारणं होती. तिला त्याच्यासोबत कम्फर्टेबल वाटत नव्हते. त्यांच्या नात्यात बऱ्याच समस्या सुरू झाल्या होत्या, त्यानंतर दोघांनीही हे संबंध संपवण्याचा निर्णय घेतला. असे म्हणतात की, रश्मिकाने तिच्या कुटुंबासह आणि पालकांशी बोलल्यानंतरच हे संबंध तोडले. रश्मिका त्या नात्यात खूपच दुःखी झाली होती.

ब्रेकअपनंतर सोशल मीडियावरील ट्रोलर्सना सुनवले खडे बोल

साखरपुडा मोडल्यानंतर, जेव्हा रश्मिकाबद्दल चुकीच्या गोष्टी चर्चेत येऊ लागल्या, तेव्हा अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे सर्वांची बोलती बंद केली होती. रश्मिकाने लिहिले, ‘मी बर्‍याच दिवसांपासून माझ्याबद्दल बर्‍याच गोष्टी ऐकत आहे. या सर्व गोष्टी मला त्रास देत आहेत. तथापि, मी कोणालाही स्पष्टीकरण देण्यासाठी येथे आले नाही. तुम्हाला आमची परिस्थिती समजून घ्यावी लागेल. कोणत्याही नाटकाप्रमाणेच प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. मला इथे काम करायचे आहे, कोणत्याही भाषेत आणि कोणत्याही विश्वात काम करताना, मी ते सर्वोत्तम होईल याचा प्रयत्न करेन.’

रश्मिकाचे नवे फोटो

 (Happy Birthday Rashmika Mandanna break up story of Rashmika)

बॉलीवूडमध्ये पदार्पण

कन्नड, तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर रश्मिका आता बॉलिवूडमध्ये आपली जादू पसरवणार आहे. ‘मिशन मजनू’ या चित्रपटाद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

बिग बींबरोबर स्कीन शेअर करणार

याशिवाय नुकताच रश्मिकाचा आगामी मोठा चित्रपट सुरू झाला आहे. आता ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुड बाय’ या चित्रपटात दिसणार आहे. अमिताभ बच्चन यांच्यासमवेत रश्मिका मंदनाचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल करणार असून, चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे. ‘बिग बी’ बरोबर काम करण्याबद्दल रश्मिकाही खूप उत्साही आहे.

(Happy Birthday Rashmika Mandanna break up story of Rashmika)

हेही वाचा :

Star Pravah Parivaar | स्टार प्रवाह परिवारमध्ये अरुंधती, माऊ, जयदीप सर्वोत्तम; विजेत्यांची संपूर्ण यादी

‘राम सेतू’ चित्रपटाच्या सेटवर कोरोनाचा विस्फोट, अक्षय कुमारपाठोपाठ तब्बल 45 सहकलाकारांना कोरोनाची लागण

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.