AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या चार वर्षात घटस्फोटाची वेळ?, लग्न ही मजबुरी होती?; नताशा-हार्दिकच्या नात्यातील नवा ट्विस्ट काय?

प्रसिद्ध क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा यांच्या वैवाहिक जीवनात वादळ आलं आहे. दोघांचाही घटस्फोट होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. घटस्फोटाची कारणं मात्र समोर आलेलं नाही. तसेच या चर्चांचं दोघांनी खंडनही केलेलं नाही. त्यामुळे ही चर्चा अधिकच रंगली आहे. त्यातच त्यांच्या एका खास व्यक्तीने सुद्धा त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेवर भाष्य केल्याने ही चर्चा अधिकच रंगली आहे.

अवघ्या चार वर्षात घटस्फोटाची वेळ?, लग्न ही मजबुरी होती?; नताशा-हार्दिकच्या नात्यातील नवा ट्विस्ट काय?
| Updated on: May 31, 2024 | 2:21 PM
Share

प्रसिद्ध ऑलराऊंडर क्रिकेटपटू हार्दिक पांड्या चांगलाच चर्चेत आला आहे. हार्दिकच्या वैवाहिक जीवनात मोठं वादळ आलं आहे. त्याचा पत्नीसोबत घटस्फोट होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहे. संपूर्ण सोशल मीडियात हार्दिकच्या वैवाहिक जीवनावर चर्चा सुरू झाली आहे. त्यातच अशा काही घटना घडत आहेत की हार्दिकच्या घटस्फोटाच्या चर्चांना अधिकच बळ मिळत आहे. मात्र, या मुद्द्यावर ना हार्दिकने भाष्य केलंय, ना त्याच्या बायकोने. त्यामुळे हार्दिक आणि नताशा दोघं खरोखरच वेगळे होणार का? असा सवाल केला जात आहे.

हार्दिक आणि नताशा यांच्या अत्यंत जवळच्या एका व्यक्तीने या दोघांच्या नात्यावर भाष्य केलं आहे. या व्यक्तीच्या दाव्यानुसार नताशा आणि हार्दिकच्या संसारात गेल्या सहा महिन्यापासून खटके उडत आहेत. जेव्हा नताशाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पांड्या हे आडनाव हटवल्यानंतर या दोघांमध्ये काही तरी बिनसल्याचं आणि प्रकरण अत्यंत टोकाला गेल्याचं दिसून आलं. त्यानंतर हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने या दोघांच्या नातेसंबंधावर भाष्य करत गेल्याने ही चर्चा अधिकच वाढत गेली.

वेगवेगळ्या थिअरीज

सोशल मीडियावर या दोघांच्या नात्यावर वेगवेगळ्या थिअरी मांडल्या जात आहे. कोणी काय बोलत आहे, तर कोणी काय? असा सर्व खेळ सुरू आहे. गंमत म्हणजे सोशल मीडियात घटस्फोटाच्या अफवांची एवढी चर्चा सुरू असतानाही हार्दिक आणि नाताशाकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. शिवाय या चर्चा सुरू झाल्यापासून हे दोघे एकत्र दिसले नाहीत. त्यामुळे चर्चांना अधिकच बळ मिळालं आहे. या दोघांचा घटस्फोट होणार आहे का? झाला तर कधी होईल? दोघे घटस्फोट का घेत आहेत? काय घडलंय या दोघांमध्ये? कारणं काय आहेत? याचीच चर्चा आता रंगताना दिसत आहे.

लग्नानंतर दोन महिन्यानंतर मुलाचा जन्म

दरम्यान, हार्दिक आणि नताशा यांचा विवाह 31 मे 2020मध्ये झाला होता. या दोघांची पहिली भेट 2018मध्ये एका नाईट क्लबमध्ये झाली होती. तिथेच दोघांचं सूत जमलं. हार्दिकने त्याच्या वाढदिवसाला नताशाला बोलावलं होतं. दोन वर्षाच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी लग्न केलं. नताशा लग्नाच्या आधीच प्रेग्नंट झाली होती. त्यामुळे दोघांनी लगेच लग्नाचा निर्णय घेतला होता. हार्दिकला मजबुरीने लग्नाचा निर्णय घ्यावा लागला होता असं सांगितलं जातंय. लग्नानंतर दोन महिन्याने म्हणजे जुलै 2020मध्ये त्यांना मूल झालं.

जीससशी संवाद

आता चार वर्षानंतर दोघांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्यात बिनसल्यानेच ही चर्चा सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे. आयपीएलचा संपूर्ण सीजन संपला, पण नताशा एकदाही हा सामना पाहायला आली नाही. सामन्या दरम्यान गॅलरीत हार्दिक सोबत दिसली नाही. त्यामुळेही या अफवा सुरू झाल्या आहेत. त्यातच नताशाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली. त्यात तिने जीजसशी संवाद साधला होता. मी एकटीच नसून माझ्यासोबत जीजस असल्याचं तिला सूचवायचं होतं.

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.