Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dance Deewane | ‘हंसता हुआ नूरानी चेहरा’ तब्बल 47 वर्षांनी कॅमेरासमोर, कोण आहेत अभिनेत्री ‘जीवनकला केळकर’?

काही जुनी गाणी आजही रसिक प्रेक्षकांच्या ओठी गुणगुणली जातात. या पैकीच एक अजरामर गाणं आहे 'हंसता हुआ नूरानी चेहरा'. पण, तुम्हाला त्या गाण्यातील अभिनेत्री आठवतेय का?

Dance Deewane | 'हंसता हुआ नूरानी चेहरा' तब्बल 47 वर्षांनी कॅमेरासमोर, कोण आहेत अभिनेत्री ‘जीवनकला केळकर’?
जीवनकला केळकर
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 7:45 AM

मुंबई : काही जुनी गाणी आजही रसिक प्रेक्षकांच्या ओठी गुणगुणली जातात. या पैकीच एक अजरामर गाणं आहे ‘हंसता हुआ नूरानी चेहरा’. नावं ऐकल्या बरोबरच आपल्या तोंडात त्याच्या पुढच्या ओळी सहज आल्या असतील. पण, तुम्हाला त्या गाण्यातील अभिनेत्री आठवतेय का? कदाचित तुमचं उत्तर नाही असू शकतं. छोट्या पडद्यावरील ‘डान्स दिवाने’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने या अजरामर गाण्यातील प्रसिद्ध अभिनेत्री जवळपास चार दशकानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आल्या. या अभिनेत्री म्हणजे ‘जीवनकला केळकर’ (hasta hua noorani chehra fame actress Jeevankala Kelkar life story).

‘पारसमणी’ या चित्रपटातील गाजलेल्या गाण्यात झळकलेल्या जीवनकला यांची अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगना म्हणून ओळख होती. याशिवाय त्या प्रसिद्ध पटकथा लेखक राम केळकर यांच्या पत्नी आणि अभिनेत्री मनीषा केळकर यांच्या आई आहेत. आता पुन्हा 47 वर्षांनी त्या कॅमेऱ्यासमोर आल्या आहेत. ‘डान्स दिवाने’ या डान्स शोच्या मंचावर त्यांना बोलावण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जीवनकला बऱ्याच वर्षांनी वयाच्या 77 वर्षी ‘हंसता हुआ नूरानी चेहरा’ या गाण्यावर नृत्य देखील केले.

पाहा व्हिडीओ

(hasta hua noorani chehra fame actress Jeevankala Kelkar life story)

कोण आहेत जीवनकला?

अभिनय आणि नृत्यामुळे हिंदी-मराठी सृष्टीत जीवनकला यांना एक उत्तम अभिनेत्री म्हणून वेगळी ओळख मिळाली आहे. 70च्या दशकातील हिंदी-मराठी चित्रपटातील अनेक हिट गाणी त्यांच्यावर चित्रित झालेली पाहायला मिळतात. जीवनकला यांच्या आई गंगुबाई आणि वडील दत्तात्रय कांबळे हे पुण्यातील युनायटेड पिक्चर्स सिंडिकेटमध्ये कलाकार म्हणून काम करत होते. 29 जून 1944 रोजी जीवनकला यांचा जन्म झाला. याच वाड्यात मंगेशकर कुटुंब देखील राहत होते. लता दिदींनीच त्यांच्या आईला लेकीसाठी ‘जीवनकला’ हे नाव सुचवले होते.

बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण!

अभिनयाची पार्श्वभूमी असणाऱ्या जीवनकला यांना ‘अखेर जमलं’ या मराठी चित्रपटात पहिल्यांदा बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. मंगेशकर कुटुंबाशी घनिष्ठ संबंध असल्याने त्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये नृत्य देखील सादर करता आले. पुढे त्यांचे कुटुंब मुंबईत आले ‘गुंज उठी शहनाई’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटात ‘अंखीयां भूल गई…’ गाण्यात नृत्य सादर करण्याची संधी त्यांना मिळाली (hasta hua noorani chehra fame actress Jeevankala Kelkar life story).

‘गुंज उठी शहनाई’ नंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. ‘किस्मत पलट के देख’, ‘सरस्वतीचंद्र’, ‘पारसमणी’, ‘पुत्र व्हावा ऐसा’, ‘चिमण्यांची शाळा’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘वैशाख वणवा’, ‘शेरास सव्वाशेर’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘काळी बायको’ अशा अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटातून सहकलाकार, खलनायिका आणि नृत्यांगना अशा विविध भूमिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. ‘जिथे सागरा धरणी मिळते…’, ‘अखेरचा हा तुला दंडवत…’, ‘हंसता हुआ नूरानी चेहरा’, ‘रेशमाच्या रेघांनी…’ अशी अनेक हिट गाणी त्यांच्यावर चित्रित झाली आहेत.

माधुरीही झाली थक्क!

जीवनकला यांचं नृत्य पाहुन या ‘डान्स दिवाने’ कार्यक्रमाची परिक्षक सुपरस्टार माधुरी दीक्षितही अवाक झाली आहे. यासह तेथील प्रेक्षकही थक्क झाले. आजही जीवनकला यांनी त्यांच्या नृत्याची आवड कायम जपून ठेवली असल्याचं यावेळी पाहायला मिळालं. मंचावर त्यांचं सगळ्यांनीच कौतुक केलं. माधुरी दीक्षित तर जीवनकला यांचे नृत्य पाहुन आश्चर्यचकीत झाली आणि माधुरीने खास त्यांच्यासाठी ‘रेशमाच्या रेघांनी’ हे गाणंही गायलं.

(hasta hua noorani chehra fame actress Jeevankala Kelkar life story)

हेही वाचा :

Video | नव्या वहिनीसाहेबांचा बिग बींच्या ‘जुम्मा-चुम्मा’वर जबरदस्त डान्स, पाहून चाहतेही म्हणाले ‘व्वा’!

Video : जान्हवी कपूरच्या पहिल्याच आयटम साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.