AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनय बेर्डेवर टीका करणाऱ्याला गौरव मोरेनं सुनावलं; म्हणाला ‘कुणाशी बोलतोय याचं भान..’

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून अभिनेता गौरव मोरे हा ‘पवई फिल्टर पाड्याचा बच्चन’ या नावाने घराघरात पोहोचला. हास्यजत्रेमुळे गौरवच्या चाहत्यांमध्ये खूप वाढ झाली. काही दिवसांपूर्वी गौरवने प्रेक्षकांना निराश करणारा निर्णय जाहीर केला होता.

अभिनय बेर्डेवर टीका करणाऱ्याला गौरव मोरेनं सुनावलं; म्हणाला 'कुणाशी बोलतोय याचं भान..'
Abhinay Berde and Gaurav MoreImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 12, 2024 | 1:20 PM

विनोदवीर गौरव मोरे याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून निरोप घेत असल्याचं जाहीर केलं होतं. हास्यजत्रेच्या सेटचा व्हिडीओ पोस्ट करत त्याने भावना व्यक्त केल्या होत्या. गौरवच्या या पोस्टवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. मराठी कलाविश्वातील काही कलाकारांनीही गौरवच्या पोस्टवर कमेंट करत त्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. अशातच दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेनंही कमेंट करत गौरवला शुभेच्छा दिल्या. मात्र त्याने केलेली कमेंट एका युजरने विशेष आवडली नाही. अभिनयच्या कमेंटवरून संबंधित युजरने ट्रोल करण्याचा प्रयत्न केला असता गौरवने त्याला उत्तर दिलं.

गौरवच्या पोस्टवर कमेंट करत अभिनयने लिहिलं, ‘ऑल द बेस्ट गौऱ्या, लव्ह यू!’ अभिनयने गौरवचा उल्लेख ‘गौऱ्या’ असा केला म्हणून एका युजरने नाराजी व्यक्त केली. ‘अरे गौरव आर्ट कलाकार आहे आणि तू फार्ट कलाकार आहेस. गौरव दादा किंवा सर म्हणायचे कष्ट घे’, असं त्याने लिहिलं. त्यावर अभिनयने संबंधित युजरला उत्तर देताना म्हटलं, ‘विनोदाचा प्रयत्न खूप चांगला आहे पण ‘गौऱ्या’ आर्ट नाही ऑल राऊंड कलाकार आहे.’

हे सुद्धा वाचा

अभिनयवर टीका करणाऱ्या युजरवर गौरवने संताप व्यक्त केला. ‘आणि महत्त्वाचं आपण कोणाशी बोलतोय याचं भान ठेवा. अभिनय बेर्डे हे एक प्रतिष्ठित नाव आहे. त्यामुळे जरा जपून बोला’, अशा शब्दांत त्याने युजरला खडसावलं. यानंतर त्या युजरने गौरव आणि अभिनयला प्रत्युत्तर दिलं. ‘भाई आपली अॅक्टिंग मी तुम्हाला मिशी फुटत असताना पासून बघतोय. एकांकिका आणि नाटकातील काम पाहिलं. तुमच्यापेक्षा वय आणि कारकिर्दीने लहान असलेल्या नवोदित अभिनेत्याने एकेरी आणि उद्धट हाक मारावी हे योग्य नाही. प्रतिष्ठित अभिनेता होण्यासाठी तुम्ही कष्ट घेतले आहेत कोणत्याही लेबल किंवा गॉडफादरशिवाय. लव्ह यू भाई.’

संबंधित युजरने अभिनयसाठी पुढे लिहिलं, ‘अभिनय हा विनोदाचा प्रयत्न अजिबात नव्हता. त्यासाठी तुम्ही कलाकार आहात. माझा मुद्दा आदर हा आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कलाकार एकमेकांशी खूप आदराने वागतात. त्यांच्याकडून प्रत्येकाने शिकावं. धन्यवाद. लव्ह यू टू!’