Kesariya: ‘केसरिया’चा भोजपुरी व्हर्जन पाहिला का? ओरिजिनल गाणंही विसराल!

रणबीर-आलियाच्या भोजपुरी 'केसरिया'ला मूळ गाण्यापेक्षाही जास्त पसंती

Kesariya: 'केसरिया'चा भोजपुरी व्हर्जन पाहिला का? ओरिजिनल गाणंही विसराल!
Kesariya SongImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 09, 2022 | 5:32 PM

मुंबई- रणबीर कपूर-आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) चित्रपटातील ‘केसरिया’ (Kesariya) गाणं एकदा तरी तुमच्या कानावर नक्की पडलं असेल. अरिजित सिंगने गायलेलं मूळ गाणं सोशल मीडियावर तुफान गाजलं. ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस झाले आहेत. तरीही केसरिया गाण्याची क्रेझ अजूनही कायम आहे. या गाण्यावर युट्यूब आणि इन्स्टाग्रामवर बरेच व्हिडीओ बनवले गेले आहेत. सध्या सोशल मीडियावर केसरियाचा भोजपुरी व्हर्जन (Bhojpuri Version) चांगलाच व्हायरल होतोय. या गाण्याला मूळ गाण्यापेक्षाही जास्त पसंती मिळतेय.

केसरियाच्या मूळ गाण्यात रणबीर आणि आलिया हे वाराणसीच्या रस्त्यावर नाचताना पहायला मिळतात. तर भोजपुरी व्हर्जनमध्ये थोडासा बदल पहायला मिळतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये रणबीर आणि आलिया डान्स तर करत आहेत, पण गाणं पूर्णपणे बदललं आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Tokichiki ?? (@pandeyniti)

या नव्या केसरिया व्हर्जनच्या बॅकग्राऊंडमध्ये पवन सिंहचं हिट गाणं ‘लॉलीपॉप लागेलू’ ऐकायला मिळतंय. रणबीर-आलिया याच गाण्यावर नाचताना दिसत आहेत. केसरिया आणि लॉलीपॉप लागेलूचा हा ट्विस्ट नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा सर्वोत्कृष्ट व्हिडीओ आहे, असं एका युजरने म्हटलंय. तर हा व्हर्जन मूळ गाण्यापेक्षाही खूप चांगला आहे, असं लिहित दुसऱ्या युजरने हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत.

एका इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 13 हजारहून अधिक लोकांनी त्याला लाइक केलंय.

‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्टसोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. अयान मुखर्जीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....