Hema Malini|”कोणालाच असं आयुष्य..”; धर्मेंद्र यांच्यापासून वेगळं राहण्याबद्दल काय म्हणाल्या हेमा मालिनी?

करिअरच्या शिखरावर असताना हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या. त्यावेळी धर्मेंद्र विवाहित आणि चार मुलांचे पिता होते. हेमा आणि धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये लग्नगाठ बांधली. 1981 मध्ये हेमा यांनी ईशाला जन्म दिला तर 1985 मध्ये अहानाचा जन्म झाला.

Hema Malini|कोणालाच असं आयुष्य..; धर्मेंद्र यांच्यापासून वेगळं राहण्याबद्दल काय म्हणाल्या हेमा मालिनी?
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 8:25 AM

मुंबई : हेमा मालिनी आणि धर्मेंद्र हे बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. 1980 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यावेळी धर्मेंद्र आधीच विवाहित आणि चार मुलांचे पिता होते. धर्मेंद्र यांच्याशी लग्न केल्यानंतर हेमा मालिनी वेगळ्या राहू लागल्या आणि धर्मेंद्र यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला कधीच सोडलं नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या आहेत. लग्नानंतर वेगळं राहण्याच्या निर्णयामुळे समाजात स्त्रीवादी प्रतिमा कशी निर्माण झाली आणि तसं असूनही धर्मेंद्र यांनी कशी साथ दिली, याविषयी त्यांनी सांगितलं.

हेमा म्हणाल्या, “कोणालाच तसं राहायला आवडत नाही. पण कधी कधी घटना तशा घडतात. त्यामुळे जे घडतं ते तुम्हाला स्वीकारावं लागतं. अन्यथा कोणालाच असं आयुष्य जगायला आवडणार नाही. प्रत्येक महिलेला पती, मुलं आणि सर्वसामान्य कुटुंब हवं असतं. पण कुठेतरी गोष्टी हातापलीकडे गेल्या. पण मला त्याविषयी अजिबात वाईट वाटत नाही किंवा त्याची तक्रार मी करत नाही. मी माझ्यासाठी खुश आहे. माझ्या दोन मुली आहेत आणि त्या दोघींचं संगोपन मी उत्तमरित्या केलं.”

हे सुद्धा वाचा

या मुलाखतीत हेमा मालिनी सांगितलं की त्या दीर्घकाळापासून ‘गुरू माँ’ यांच्या अनुयायी आहेत. त्यांनी केवळ कारकिर्दीतच नव्हे तर महत्त्वाच्या अनेक वैयक्तिक प्रसंगांवरही मार्गदर्शन केल्याचं हेमा म्हणाल्या. त्याचसोबत आपल्या मुलींसाठी धर्मेंद्र नेहमीच उपस्थित होते, याबद्दलही त्यांनी त्यांचे आभार मानले. “ईशा आणि अहाना या आपल्या दोन्ही मुलींच्या पाठिशी त्यांचे वडील धर्मेंद्र कायम उभे राहिले. त्या दोघींसाठी ते (धर्मेंद्र) नेहमीच हजर असायचे. हीच सर्वोत्कृष्ट बाब आहे की ते नेहमी आमच्यासोबत होते. ते मुलींच्या लग्नाविषयी खूप चिंतेत असायचे. दोन्ही मुलींचं लग्न वेळेत आणि योग्य व्यक्तीशी लग्न झालं पाहिजे, असं ते म्हणायचे. त्यावर मी त्यांना सांगायचे की, जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा योग्य व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येईल. देवाच्या आणि गुरू माँच्या कृपेने सर्वकाही चांगलं झालं”, असं त्या पुढे म्हणाल्या.

करिअरच्या शिखरावर असताना हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या. त्यावेळी धर्मेंद्र विवाहित आणि चार मुलांचे पिता होते. हेमा आणि धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये लग्नगाठ बांधली. 1981 मध्ये हेमा यांनी ईशाला जन्म दिला तर 1985 मध्ये अहानाचा जन्म झाला. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्याशी झालं होतं. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना सनी देओल, बॉबी देओल ही दोन मुलं आणि विजीता- अजीता या दोन मुली आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.