Gadar 2 पाहिल्यानंतर सनी देओलची सावत्र आई हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाल्या..

हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलने आयोजित केलेल्या 'गदर 2'च्या स्पेशल स्क्रिनिंगला सनी देओल आणि बॉबी देओल यांनी हजेरी लावली होती. यावेळी तिघांनी एकत्र पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले.

Gadar 2 पाहिल्यानंतर सनी देओलची सावत्र आई हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाल्या..
Sunny Deol and Hema MaliniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 8:43 AM

मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : देओल कुटुंबीयांसाठी 2023 हे वर्ष खूपच खास ठरत आहे. जून महिन्यात सनी देओलचा मुलगा करण देओलचा लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर आता सनी देओलचा ‘गदर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. ‘गदर 2’ या चित्रपटानिमित्त बऱ्याच वर्षांनंतर ईशा देओल आणि सनी देओल एकत्र दिसले. बहीण ईशाने खास भावासाठी या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं. त्यानंतर आता सावत्र आई हेमा मालिनी यांनी सनी देओल आणि त्याच्या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. हेमा मालिनी यांनी पापाराझींसमोर बोलताना ‘गदर 2’ चित्रपट पाहिल्याचं सांगितलं. हा चित्रपट कसा वाटला असा प्रश्न विचारला असता, त्यांनी दिग्दर्शक, कलाकार आणि कथेची भरभरून स्तुती केली.

काय म्हणाल्या हेमा मालिनी?

थिएटरबाहेर पापाराझींशी बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या, “गदर 2 हा चित्रपट पाहिला. मला खूपच आवडला. चित्रपटाकडून ज्या अपेक्षा होत्या, त्या सर्व पूर्ण झाल्या आहेत. खूपच रंजक चित्रपट बनवला आहे. असं वाटतं होतं जणून 70 आणि 80 च्या दशकातील काळ परतला आहे. तेव्हाचा काळ दिग्दर्शक अनिल शर्माजी पुन्हा घेऊन आले आहेत. त्यांची चित्रपटाचं दिग्दर्शन उत्तमरित्या केलं आहे.”

सनी देओलचं केलं कौतुक

“सनीने सुपर्ब कामगिरी केली आहे. अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्षनेही खूप सुंदर अभिनय केलं आहे. जी नवीन अभिनेत्री या चित्रपटात पहायला मिळाली, तिनेसुद्धा चांगलं काम केलं. हा चित्रपट पाहिल्यानंतर मनात राष्ट्रभक्तीची भावना उसळून येते. मुस्लिमांविषयी जो बंधुभाव असायला हवा, तो या चित्रपटाच्या अखेरच्या भागात पहायला मिळतो. भारत आणि पाकिस्तानसाठी हा चांगला संदेश आहे”, असं त्या पुढे म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलने आयोजित केलेल्या ‘गदर 2’च्या स्पेशल स्क्रिनिंगला सनी देओल आणि बॉबी देओल यांनी हजेरी लावली होती. यावेळी तिघांनी एकत्र पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. ‘गदर 2’ या चित्रपटाने कमाईचा 300 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’चा सीक्वेल आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.