Hema Malini | धर्मेंद्र यांच्याविषयी आवडलेली सर्वांत मोठी गोष्ट; हेमा मालिनी यांनी केला खुलासा

1980 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यावेळी धर्मेंद्र आधीच विवाहित आणि चार मुलांचे पिता होते. धर्मेंद्र यांच्याशी लग्न केल्यानंतर हेमा मालिनी वेगळ्या राहू लागल्या आणि धर्मेंद्र यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला कधीच सोडलं नाही.

Hema Malini | धर्मेंद्र यांच्याविषयी आवडलेली सर्वांत मोठी गोष्ट; हेमा मालिनी यांनी केला खुलासा
हेमा मालिनी, धर्मेंद्र
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 11:51 AM

मुंबई : अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. लग्नानंतर हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्यासोबत राहत नसल्या तरी मुलाखतींमध्ये त्या वैवाहिक आयुष्याबद्दल मोकळेपणे बोलण्यापासून कधीच मागे हटत नाहीत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या धर्मेंद्र यांच्याविषयी व्यक्त झाल्या. 1980 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यावेळी धर्मेंद्र आधीच विवाहित आणि चार मुलांचे पिता होते. धर्मेंद्र यांच्याशी लग्न केल्यानंतर हेमा मालिनी वेगळ्या राहू लागल्या आणि धर्मेंद्र यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला कधीच सोडलं नाही. धर्मेंद्र यांच्याशी पहिल्यांदा भेट झाल्यानंतर त्यांच्या कोणत्या गोष्टी आवडू लागल्या होत्या, या प्रश्नाचं उत्तर हेमा यांनी या मुलाखतीत दिलं.

हेमा यांनी धर्मेंद्र यांना एका चित्रपटाच्या प्रीमिअरमध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं. त्यावेळी त्यांच्या दिसण्यावरून हेमा मालिनी प्रभावित झाल्या होत्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हेमा यांना विचारण्यात आलं की धर्मेंद्र यांच्या कोणत्या गोष्टीने त्या आकर्षित झाल्या होत्या. त्यावर त्या म्हणाल्या की “इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा ते स्वभावाने खूप चांगले आहेत. बाहेर शूटिंग असली तरी आम्ही एकत्र बराच वेळ घालवायचो आणि त्यावेळी त्यांनी खूप साथ दिली. त्यामुळे हळूहळू मी त्यांच्यावर विसंबून राहू लागले होते. स्वभावाने ते खूपच साधे आहेत.”

हे सुद्धा वाचा

याच मुलाखतीत हेमा मालिनी त्यांच्यापासून वेगळं राहण्याबद्दल व्यक्त झाल्या. हेमा म्हणाल्या, “कोणालाच तसं राहायला आवडत नाही. पण कधी कधी घटना तशा घडतात. त्यामुळे जे घडतं ते तुम्हाला स्वीकारावं लागतं. अन्यथा कोणालाच असं आयुष्य जगायला आवडणार नाही. प्रत्येक महिलेला पती, मुलं आणि सर्वसामान्य कुटुंब हवं असतं. पण कुठेतरी गोष्टी हातापलीकडे गेल्या. पण मला त्याविषयी अजिबात वाईट वाटत नाही किंवा त्याची तक्रार मी करत नाही. मी माझ्यासाठी खुश आहे. माझ्या दोन मुली आहेत आणि त्या दोघींचं संगोपन मी उत्तमरित्या केलं.”

त्याचसोबत आपल्या मुलींसाठी धर्मेंद्र नेहमीच उपस्थित होते, याबद्दलही त्यांनी त्यांचे आभार मानले. “ईशा आणि अहाना या आपल्या दोन्ही मुलींच्या पाठिशी त्यांचे वडील धर्मेंद्र कायम उभे राहिले. त्या दोघींसाठी ते (धर्मेंद्र) नेहमीच हजर असायचे. हीच सर्वोत्कृष्ट बाब आहे की ते नेहमी आमच्यासोबत होते. ते मुलींच्या लग्नाविषयी खूप चिंतेत असायचे. दोन्ही मुलींचं लग्न वेळेत आणि योग्य व्यक्तीशी लग्न झालं पाहिजे, असं ते म्हणायचे. त्यावर मी त्यांना सांगायचे की, जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा योग्य व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येईल. देवाच्या आणि गुरू माँच्या कृपेने सर्वकाही चांगलं झालं”, असं त्या पुढे म्हणाल्या.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.