अभिनेत्री हेमांगी कवी ही तिच्या बोल्ड वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. सहसा मनमोकळेपणे व्यक्त न होणाऱ्या विषयांवर हेमांगी बिनधास्तपणे वक्तव्य करताना दिसते. हेमांगीची ‘बाई.. बुब्स.. आणि ब्रा’ ही पोस्ट विशेष गाजली होती. अनेकांनी हेमांगीला या पोस्टसाठी पाठिंबा दिला होता. दरम्यान, हेमांगीने नुकताच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे बोल्ड फोटो पाहून नेटकऱ्यांनी हेमांगीला ट्रोल केले आहे.
काय आहे हेमांगीचा फोटो?
हेमांगी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत काही ना काही सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते. नुकताच हेमांगीने तिचे बोल्ड फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये हेमांगीने ब्रालेट घातले असून शर्ट आणि पँट घातली आहे. मोकळे केस, न्यूड मेकअपमध्ये हेमांगी अतिशय बोल्ड दिसत आहे. हेमांगी या फोटोमध्ये आरशामध्ये सेल्फी घेताना दिसत आहे. हेमांगीने तिच्या आयफोनमध्ये हा मिरर सेल्फी क्लिक केला आहे.
नेटकऱ्यांनी केले ट्रोल
सोशल मीडियावर हेमांगीचा हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी या फोटोवर कमेंट करत हेमांगीला सुनावले आहे. एका यूजरने, ‘आयफोन दाखवायला अजून सोपी पद्धत पण आहे’ असे म्हटले होते. त्यावर हेमांगीने, ‘आयफोन आता सगळ्यांकडे असतो. आयफोन शो ऑफचा जमाना गेला’ असे उत्तर देत ट्रोलरला सुनावले आहे. दुसऱ्या एका यूजरने ‘तुम्ही साधेपणामध्येच बरं दिसता. हे अंग प्रदर्शन नको… एक मेंढी विहीरमध्ये पडली म्हणजे सगळेच पडायला नको’ असे म्हटले आहे.
हेमांगीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती सध्या झी टीव्हीवरील मालिका ‘कैसे मुझे तुम मिल गए’मध्ये दिसत आहे. तसेच यापूर्वी हेमांगी सोनी टीव्हीवरील कॉमेडी शो मॅडनेस मचाएंगेमध्ये धुमाकूळ घालताना दिसली होती. तसेच तिने चंदू चॅम्पियन, लाइफलाइन, टाळी आणि इतर काही चित्रपटांमध्ये काम केले आहे.