हेमंत ढोमेच्या कुटुंबात नवीन सदस्याचं आगमन, 2 खास फोटो पोस्ट करत म्हणाला…

Hemant Dhome: कुटुंबात नवीन सदस्याचे फोटो पोस्ट करत हेमंत ढोमे म्हणाला..., 'त्या' फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष, हेमंत कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेता फोटो आणि व्हिडीओ कायम पोस्ट करत असतो.

हेमंत ढोमेच्या कुटुंबात नवीन सदस्याचं आगमन,  2 खास फोटो पोस्ट करत म्हणाला...
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 12:11 PM

‘झिम्मा’, ‘झिम्मा 2’ या सिनेमांमुळे अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, निर्माता हेमंत ढोमे यांच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. आता सध्या हेमंत ‘फसक्लाल दाभाडे’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. नव्या वर्षी हेमंत नव्या सिनेमासह चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. आगामी सिनेमाबद्दलचे सर्व अपडेट अभिनेता सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतो. पण आता हेमंत आगामी सिनेमामुळे नाही तर, सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. हेमंत याच्या कुटुंबात नव्या सदस्याचं आगमन झालं आहे. अभिनेत्याने फोटो शेअर केले आहे.

हेमंत याच्या कुटुंबात आलेली दुसरी तिसरी कोणी नाही तर गाय आहे. अभिनेत्याने गायीचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहे. फोटो पहिला फोटो पोस्ट करत हेमंत म्हणाला, ‘आपल्या फॅमिलीची नवी मेंबर… लक्ष्मी ढोमे…’ सध्या अभिनेत्याची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

गायीचा अन्य एक फोटो पोस्ट करत हेमेंत म्हणाला, ‘देखणी लक्ष्मी…‘ हेमंत याने शेअर केलेल्या गायीचे फोटो सध्या तुफान चर्चेत आहेत. चाहत्यांनी देखील अभिनेत्याची पोस्ट आवडली आहे. हेमंत कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

हमेंत ढोमे याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. एका देखील अभिनेता ‘फसक्लाल दाभाडे’ सिनेमाच्या कामांमध्ये व्यस्त आहे. सिनेमात लेखण आणि दिग्दर्शन स्वतः हेमंत ढोमे याने केलं आहे. तर सिनेमात निवेदिता सराफ, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, हरीश दुधाडे, राजसी भावे, राजन भिसे यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

‘फसक्लाल दाभाडे’ पुढच्या वर्षी 24 जानेवारी 2025 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा पोस्टर अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आता चाहते देखील ‘फसक्लाल दाभाडे’ सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. सिनेमाची कथा खुळ्या भावंडांभोवती फिरताना दिसणार आहे.

‘पोस्टर गर्ल’, ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘झिम्मा’, ‘झिम्मा 2’ यांसारखे दमदार सिनेमे हेमंत याने चाहत्यांच्या भेटीस आणले. सिनेमाने चाहत्यांचं मनोरंजन देखील केलं. आता ‘फसक्लाल दाभाडे’ सिनेमा चाहत्यांचं किती मनोरंजन करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.