Hemant Dhome: ‘आम्ही बंड केलं की आई..’, हेमंत ढोमेचं एकनाथ शिंदेंबाबत सूचक टि्वट

हेमंतच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'लहानपणीचं बंड निस्वार्थी, निरागस असायचं. आताच्या राजकारण्यांसारखं कपटी नसायचं,' असं एकाने म्हटलंय. तर 'आता बंडाच्यासोबत ‘बाप’ असल्यामुळे आई हतबल आहे', असं दुसऱ्या युजरने लिहिलं.

Hemant Dhome: 'आम्ही बंड केलं की आई..', हेमंत ढोमेचं एकनाथ शिंदेंबाबत सूचक टि्वट
Hemant Dhome and Eknath ShindeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 11:44 AM

महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार अस्थिर करण्यासाठी महाराष्ट्रात मंगळवारपासून घमासान सुरू आहे. महाराष्ट्रासोबतच गुजरात, आसाममध्येही मोठी खलबतं सुरू आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मंगळवारी दिवसभर सूरतमध्ये होते. त्यानंतर ते सूरतहून आसामच्या दिशेने निघाले. शिंदे सध्या आसाममधील गुवाहाटी इथं आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्षाचे जवळपास 40 हून अधिक आमदार आहेत. मध्यरात्रीनंतर पोलिसांच्या कडक सुरक्षेत शिवसेनेचे बंडखोर आमदार स्पाइसजेटच्या विमानातून गुवाहाटीकडे रवाना झाले होतं. या सर्व घडामोडींवर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनंही (Hemanth Dhome) या बंडाबाबत सूचक ट्विट केलं आहे. ‘आम्ही बंड केलं की आई कालथ्याने चटका द्यायची,’ असं त्याने उपरोधिक ट्विट केलंय.

‘आम्ही बंड केलं की आई कालथ्याने चटका द्यायची. पण ती तेव्हा प्रायवेट विमानाने डायरेक्ट गुवाहाटीला घेऊन गेली असती तर आज आमची आयुष्यं वेगळी असती, काय म्हणता,’ असं ट्विट हेमंतने केलं. यासोबतच त्याने #बंड असा हॅशटॅग वापरला.

हे सुद्धा वाचा

हेमंत ढोमेचं ट्विट-

हेमंतच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘लहानपणीचं बंड निस्वार्थी, निरागस असायचं. आताच्या राजकारण्यांसारखं कपटी नसायचं,’ असं एकाने म्हटलंय. तर ‘आता बंडाच्यासोबत ‘बाप’ असल्यामुळे आई हतबल आहे’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं. ‘सर्व नियोजित असतं. आपल्याला समजायला थोडा वेळ लागतो’, असं नेटकऱ्याने म्हटलंय.

महाविकास आघाडी सरकार टिकवून ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानावर शिवसेनेच्या सर्व आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. संध्याकाळी पाच वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना आमदारांचा गट असल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात आलं आहे. सरकारच्या बहुमताचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारच्या बहुमताबाबत भाजप प्रश्न उपस्थित करत अविश्वास ठराव आणणार की आणखी कोणती रणनीती आखणार यावर राज्यातील पुढील राजकारण अवलंबून असणार आहे.

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.