Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urfi Javed: “देशातल्या तरुणींनी तिच्याकडून शिकायला हवं”; सेलिब्रिटीकडून उर्फी जावेदचं तोंडभरून कौतुक

उर्फी जावेदला या प्रसिद्ध गायकाचा पाठिंबा; देशातील इतर तरुणींना तिच्याकडून शिकण्याचा दिला सल्ला

Urfi Javed: देशातल्या तरुणींनी तिच्याकडून शिकायला हवं; सेलिब्रिटीकडून उर्फी जावेदचं तोंडभरून कौतुक
उर्फी जावेद
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 9:12 AM

मुंबई: अभिनेत्री उर्फी जावेद आणि तिच्या कपड्यांवरून होणारा वाद सर्वश्रुत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. उर्फीने या सर्व गोष्टींना न जुमानता पुन्हा बोल्ड कपडे परिधान करून फोटोशूट केले. सोशल मीडियावर तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र त्याकडेही ती कानाडोळा करते. आता बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध रॅपर आणि गायकाने उर्फीला पाठिंबा दिला आहे. इतकंच नव्हे तर देशातल्या तरुणींनी तिच्याकडून शिकवण घ्यावी असा सल्ला त्याने दिला आहे.

उर्फीला पाठिंबा देणारा हा रॅपर आणि गायक दुसरा तिसरा कोणी नसून हनी सिंग आहे. हनी सिंगने नुकताच त्याचा नवीन अल्बम ‘हनी 3.0’ प्रदर्शित केला आहे. या अल्बमनिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत त्याला उर्फीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “मला ती मुलगी खूप आवडते. ती खूप निडर आणि धाडसी आहे. तिला तिच्या पद्धतीनेच जगायला आवडतं. भारतातल्या तरुणींनी तिच्याकडून शिकावं.”

हे सुद्धा वाचा

“तुमच्या मनाला जसं वाटेल तसं वागा, कोणालाच घाबरू नका. तुम्ही कुठून आहात, कोणत्या धर्माचे, जातीचे किंवा कुटुंबाचे आहात, तेच तुम्हाला पाळण्याची गरज नाही. मात्र तुमचं मन जे सांगतंय, ते नक्की करा, कोणत्याच भितीशिवाय”, असं तो पुढे म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

याच मुलाखतीत हनी सिंगने आपल्या कुटुंबीयांचं ऐकण्याबद्दल भाष्य केलं. कुटुंबीयांचं न ऐकल्यामुळेच माझं खूप नुकसान झालं, असंही तो म्हणाला. हनी सिंगने 2014 मध्ये ‘देसी कलाकार’ हा अल्बम प्रदर्शित केला होता. मात्र त्यानंतर तो बरेच महिने गायब होता. त्याने बॉलिवूडमधल्या बऱ्याच चित्रपटांची गाणीही गायली आहेत.

प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा.
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश.
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात.