AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हृतिक रोशन शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटात दिसण्याची शक्यता!

शाहरुख खानचा चित्रपट पठाणची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करीत आहेत.

हृतिक रोशन शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटात दिसण्याची शक्यता!
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 10:30 AM

मुंबई : शाहरुख खानचा चित्रपट पठाणची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करीत आहेत, ज्यांनी यापूर्वी वॉरसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. पठाण हा चित्रपट एक मोठा मल्टीस्टारर चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत सलमान खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमही दिसणार आहेत. आता या चित्रपटाशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे.(Hrithik Roshan likely to appear in Shahrukh Khan’s Pathan)

बॉलिवूड हंगामाच्या माहितीनुसार हृतिक रोशन देखील या चित्रपटात दिसू शकतो. असे सांगितले जात आहे की, चित्रपटात हृतिकलाही कास्ट केल्याची चर्चा आहे. या वृत्तानुसार, सिद्धार्थने हृतिकबरोबर ‘वॉर’ चित्रपटात काम केले आहे आणि त्याच वेळी त्याने ‘पठाण’ मध्ये कबीरच्या भूमिका करण्याविषयी हृतिक अॅफरही दिली असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत जर सर्व काही ठीक झाले तर हृतिकही या चित्रपटात दिसू शकतो.

या अगोदर बातमी अशी होती की, अभिनेत्री डिंपल कपाडियासुद्धा या चित्रपटात दिसणार आहे. खरं तर, हॉलीवूड चित्रपट टेनेटमध्ये डिंपल कपाडियाची जबरदस्त कामगिरी पाहून तिला आता बॉलिवूडमधूनही बरीच प्रोजेक्ट्स येत आहेत. सिद्धार्थ आनंदने डिंपल कपाडियाला पठाण या चित्रपटात काम करण्याची अॅफर दिल्याची ही सर्वत्र चर्चा आहे. डिंपलची नेमकी कोणती भूमिका चित्रपटात असणार आहे यांची माहिती देखील पुढे आली आहे. डिंपल पठाण चित्रपटात एका रॉ अधिकाऱ्याच्या भूमिकेत असणार आहे. आणि डिंपलाही ही भूमिका आवडली आहे. असे सांगितले जात आहे की, डिंपल कपाडियाला स्क्रिप्ट आवडली आहे.

हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘वॉर’ चित्रपटाने शानदार कमाई केली होती. या चित्रपटाने चार दिवसांत 123 कोटींची कमाई केली होती. त्यासोबतच ‘वॉर’ने बॉक्स ऑफिसवर सहा नवे विक्रम रचले आहेत.

दोन ऑक्टोबरच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘वॉर’ने पहिल्याच दिवशी तब्बल 51.60 कोटी रुपयांची कमाई केली होती. सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे बुधवारी ‘वॉर’ने तूफान गल्ला जमवला होता.

वॉर’ चित्रपटाचे महत्त्वाचे विक्रम

1. सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा हिंदी चित्रपट 2. 2019 मधील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट 3. सार्वजिनक सुट्टीला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट 4. हृतिक रोशनच्या कारकीर्दीतील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट 5. टायगर श्रॉफच्या कारकीर्दीतील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट 6. यशराजच्या इतिहासात सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट

याशिवया तीन दिवसांत 100 कोटींच्या घरात प्रवेश करणारा ‘वॉर’ हा यशराजचा पाचवा चित्रपट ठरला होता.

Krrish 4 | ‘क्रिश 4’ मध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत कियारा अडवाणी दिसण्याची शक्यता!

(Hrithik Roshan likely to appear in Shahrukh Khan’s Pathan)

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.