‘हुनरबाज’चा आकाश सिंग बिहारमधून दीड हजार रुपये घेऊन आलेला ; आणि आता तो शर्यत जिंकलाच तर होणार…
आकाश हा खांबाला लटकून त्याचे स्टंट दाखवण्यासाठी म्हणून खास ओळखला जातो आहे, त्याची ही कला बघून तो या कार्यक्रमाचा अंतिम विजेता असू शकेल असं बोललं जात आहे.
मुंबईः कलर्स टीव्हीवरील (Colors Tv) टॅलेंट रिअॅलटी शो हुनरबाज (Hunarbaaz) च्या रंगमंचावर कंटेस्टेंट आकाश सिंग हा आता टॉप 12 मध्ये त्याने आपल्या हुशारीवर आपली जागा निश्चित केली आहे. आकाश (Akash singh) हा खांबाला लटकून त्याचे स्टंट दाखवण्यासाठी म्हणून खास ओळखला जातो आहे, त्याची ही कला बघून तो या कार्यक्रमाचा अंतिम विजेता असू शकेल असं बोललं जात आहे.
या रिअॅलटी शोसाठी मला बोलवण्यात आले त्यावेळी माझ्याकडे फक्त 1500 रूपये होते. आणि त्यावेळी मला वाटले की, मुंबईमध्ये गेल्यावर ते माझा सगळा खर्च करतील पण ज्यावेळी मी मुंबईला आलो त्यावेळी या कार्यक्रमासाठी माझी निवड झाली नाही, आणि त्यानंतर या टीमने माझ्याशी संपर्कही साधला नाही.
घरी गेलो असतो तर स्वप्न सत्यात आलं नसतं
आकाश आपल्या प्रवासाविषयी सांगताना म्हणतो की, कार्यक्रमाच्या काळात मी मुंबईच्या रस्त्यावर राहिलो, त्याकाळात मी निराश होऊन घरी गेलो असतो तर माझी स्वप्नं पूर्ण होऊ शकली नसती. त्यावेळी मला कुणीतरी सांगितले की, याप्रकारचे ट्रेनिंग शिवाजी पार्कवर दिले जाते. त्यावेळी मला दादर कुठे आहे हेही ठाऊक नव्हते, त्यामुळे विचारत मी त्या शिवाजी पार्कवर गेलो तेव्हा आणि माझी मी प्रॅक्टीस सुरु केली त्यावेळी दादरमधील एका व्यायामशाळेच्या कोचने मला प्रॅक्टीस करताना बघितले.
संघर्ष केला म्हणून सगळं मिळालं
शिवाजी पार्कजवळ खेळातील अनेक संघ सराव करत असतात. आणि आकाश ज्यो कोचबद्दल सांगत आहेत ते मल्लखांबचे ट्रेनिंग देतात. त्यावेळी त्या कोचना आकाश सिंगने सांगितले की, एकदा माझी प्रॅक्टीस तुम्ही बघा. त्यानंतर जेव्हा त्यांनी माझा सराव बघितला तेव्हा त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तयार झाले आणि माझी राहण्याची व्यवस्थाही त्यांनीच केली. या काळात मी पेपर टाकणे, दूधच्या पिशव्या पोहच करणे आणि वॉचमनचे कामही केले. मात्र मी प्रॅक्टीस थांबवली नाही.
… तोच माणूस नंतर सुपरस्टार होतो
“आकाश सिंग सांगतो की, मला सारखं वाटायचं की मुंबईत गेलं की, लोक हिरो बनतात. त्यांना कोणीतरी बघतं आणि ते त्यांच्यासाठी मसिहा बनून जातात आणि तोच माणूस नंतर सुपरस्टार होऊन जातो, जसं अमिताभ आणि शाहरूख खान. मलाही असे एक सर मिळाले की, माझं आयुष्यच त्यांनी बदलून टाकलं. या कार्यक्रमांनं तर माझ्यावर खूप प्रेम केलं आहे. या कार्यक्रमानेच माझं आयुष्य बदलून टाकलं आहे. मला असं वाटत आहे की, कधी तरी मीही माझ्या देशाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर मी प्रतिनिधीत्व करेन.”
संबंधित बातम्या
समांथाचा नवा सिनेमा येतोय, नाव आहे यशोदा! काय आहे समांथाची भूमिका?
लव्ह बर्ड्स रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी ताज महाल भेटीला! पाह खास फोटो