Aishwarya Rai : बच्चन आडनावावरून ऐश्वर्याचं स्पष्ट मत; म्हणाली “मी ऐश्वर्या..”

ऐश्वर्याने 2007 मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केलं. या दोघांचा लग्नसोहळा संपूर्ण देशभरात चर्चेत होता. लग्नानंतर ऐश्वर्याला 'बच्चन कुटुंबाची सून' हा टॅग लागणं साहजिकच होतं. एका मुलाखतीत तिला यावरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ऐश्वर्याने तिचं स्पष्ट मत मांडलं.

Aishwarya Rai : बच्चन आडनावावरून ऐश्वर्याचं स्पष्ट मत; म्हणाली मी ऐश्वर्या..
Aishwarya RaiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 10:19 AM

मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री ऐश्वर्या राय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी फॅशनमुळे ऐश्वर्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. नुकतीच तिने पॅरिस फॅशन वीकमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिच्या रॅम्पवॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. ऐश्वर्या ही बच्चन कुटुंबाची सून आहे, हे तर सर्वांनाच माहीत आहे. 2007 मध्ये तिने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. ‘गुरू’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांच्या लग्नाला आता जवळपास 16 वर्षे झाली आहेत. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. मात्र फार कमी लोकांना ही गोष्ट माहीत असेल की ऐश्वर्याला फक्त बच्चन कुटुंबाची सून म्हणून हाक मारलेलं किंवा बोललेलं आवडत नाही.

2008 मध्ये एका मुलाखतीत बच्चन कुटुंबाचा टॅग लावण्यावरून ऐश्वर्याने प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी तिला असा प्रश्न विचारण्यात आला होता की, “बच्चन आडनाव लावल्यानंतर तुला स्वत:ची ओळख कुठेतरी दाबून गेल्यासारखं वाटतं का?” त्यावर उत्तर देताना ऐश्वर्या म्हणाली, “खरंतर या प्रश्नाचं माझ्याशी काहीच घेणंदेणं नाही. कारण बच्चन कुटुंबाची सून हा टॅग लोकांनी मला दिला. कारण त्यांना वाचताना ते प्रतिभावान वाटावं. पण माझ्यासाठी हे सर्व थोडं ड्रामॅटिक आहे. मी ऐश्वर्या राय नावाची एक सर्वसामान्य महिला आहे, जी अभिषेक बच्चनसोबत विवाहबंधनात अडकली. आजसुद्धा माझं नाव तेच आहे.”

हे सुद्धा वाचा

ऐश्वर्या आणि अभिषेकची पहिली भेट 2000 मध्ये ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यावेळी दोघांमध्ये फक्त चांगली मैत्री होती. त्यानंतर हळूहळू भेटीगाठी वाढल्या आणि 2006-2007 पर्यंत त्यांनी एकमेकांना डेट केलं. ‘गुरू’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक आणखी वाढत गेली आणि त्याचवेळी ऐश्वर्या-अभिषेक एकमेकांच्या प्रेमात पडले.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेकने पत्नी ऐश्वर्याचं तोंडभरून कौतुक केलं. “कधी कधी तुम्ही कामात इतके व्यस्त असता की स्वत:साठीही वेळ नसतो. ऐश्वर्याच्या खांद्यावर घराची संपूर्ण जबाबदारी असते. मी तिच्यावर प्रचंड प्रेम करतो आणि तिचे आभार मानतो. ती सर्व काम नि:स्वार्थपणाने करते,” असं तो म्हणाला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.