Taapsee Pannu | ‘मी गरोदर…’, लग्नाबद्दल तापसी पन्नू हिच्या वक्तव्यावर चाहत्यांची नाराजी
वयाच्या ३६ व्या वर्षी तापसी पन्नू हिला विचारला लग्नाबद्दल प्रश्न; अभिनेत्रीच्या वक्तव्यावर चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी... सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...
मुंबई | 1 ऑगस्ट 2023 : २०२१, २०२२ मध्ये अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या गर्लफ्रेंड / बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं. अभिनेत्री आलिया भट्ट, रणबीर कपूर, वरुण धवन, नताशा दलाल, सिद्धार्थ मल्होत्रा, किआरा अडवाणी यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. त्यांच्या लग्नाची चर्चा देखील तुफान रंगली. अशात अभिनेत्री तापसी पन्नू लग्न कधी करणार असा प्रश्न कायम चाहते विचारत असतात. तापसी पन्नू हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री बॅडमिंटनपटू प्रशिक्षक मॅथियास बोईसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगत आहेत. म्हणून अभिनेत्रीला लग्नाबद्दल विचारण्यात आलं. पण अभिनेत्रीने दिलेल्या उत्तरानंतर चाहते हैराण झाले. ज्यामुळे तापसी तुफान चर्चेत आली आहे. आज तापसीचा वाढदिवस असल्यामुळे जाणून घेवू अभिनेत्रीचं लग्नाबद्दल काय मत आहे.
काही दिवसांपूर्वी तापसीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला. तेव्हा एका चाहत्याने लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मी अद्याप गरोदर नाही… जेव्हा लग्न करेल तेव्हा तुम्हाला नक्की सांगेल…’ असं देखील तापसी म्हणाली. अद्याप गरोदर नाही या वक्तव्यामुळे तापसी तुफान चर्चेत आली आहे.
तापसी कायम तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेच असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री फार कमी प्रमाणात सक्रिय असते. इतर अभिनेते, अभिनेत्यांप्रमाणे तापसी देखील तिची लव्ह लाईफ सिक्रेट ठेवण्याचा प्रयत्न करते. पण तापसीने अनेकदा बॉयफ्रेंड मॅथियास बोईसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. पण अभिनेत्री लग्न कधी करणार हे अद्याप गुलदस्त्या आहे.
तापसी पन्नू हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री, लवकरच अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) स्टारर ‘डंकी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र तापसी हिच्या आगामी सिनेमांची चर्चा रंगत आहे.
बॉलिवूडसोबतच अभिनेत्री तामिळ सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिकेत दिसणार आहे. तापसी सध्या ‘एलियन’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर सिनेमाबद्दल मोठी अपडेट देखील शेअर केली होती.
सिनेमाचं नाव एलियन आहे, पण अभिनेत्री एलियनच्या भूमिकेत दिसणार नाही. तापसी ‘वो लडकी हैं कहां’, ‘फिर आई हसीन दिलरूबा’ आणि ‘जन गण मन’ सिनेमांमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांच्या प्रतिक्षेत असतात.