“मी त्यांच्या प्रेमात अक्षरश: वेडी होते”; जेव्हा रेखा यांनी दिली अमिताभ बच्चन यांच्या प्रेमाची जाहीर कबुली

सध्या सोशल मीडियावर रेखा यांच्या जुन्या मुलाखतीचा एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्या प्रेमाविषयी खुलेपणाने व्यक्त होताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांच्यावर त्या किती प्रेम करतात, हे या व्हिडीओतून सहज स्पष्ट होतंय.

मी त्यांच्या प्रेमात अक्षरश: वेडी होते; जेव्हा रेखा यांनी दिली अमिताभ बच्चन यांच्या प्रेमाची जाहीर कबुली
Rekha and Amitabh Bachchan
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 11:49 AM

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि सदाबहार अभिनेत्री रेखा यांची प्रेमकहाणी तर जगजाहीर आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत एकेकाळी या दोघांच्या लव्ह-स्टोरीची जोरदार चर्चा होती. या दोघांमध्ये सिक्रेट प्रेम होतं, असं म्हटलं जातं. अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी मोठ्या पडद्यावर एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटांमध्ये एकत्र काम करतानाच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. अमिताभ यांनी प्रेमाची जाहीर कबुली कधीच दिली नाही. मात्र रेखा यांचं हृदय आजसुद्धा त्यांच्यासाठी धडधडतं. सध्या सोशल मीडियावर रेखा यांच्या जुन्या मुलाखतीचा एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्या प्रेमाविषयी खुलेपणाने व्यक्त होताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांच्यावर त्या किती प्रेम करतात, हे या व्हिडीओतून सहज स्पष्ट होतंय.

सिमी गरेवाल यांना दिलेल्या मुलाखतीचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये सिमी त्यांना विचारतात की ‘तू त्यांच्या प्रेमात होतीस का?’ त्यावर रेखा म्हणतात, ‘अर्थातच, हा प्रश्नच चुकीचा आहे. मी पूर्णपणे, अत्यंत मनापासून, वेड्यासारखं त्यांच्या प्रेमात पडले आणि विशेषकरून कोणत्याही आशेविना मी प्रेमात होते. माझ्यासाठी ती सर्वांत खास व्यक्ती आहे.’ या दोघींमधील पुढील संवाद कसा होता, ते पाहुयात..

हे सुद्धा वाचा

प्रश्न- तू त्यांना भेटतेस का?

उत्तर- होय, मी त्यांना विविध कार्यक्रमांमध्ये, फंक्शन्समध्ये खूप पाहते.

प्रश्न- अवॉर्ड फंक्शन्समध्ये का?

उत्तर- होय.

प्रश्न- फक्त अवॉर्ड फंक्शन्समध्ये, फक्त तेवढंच का?

उत्तर- फक्त तेवढंच? उलट तेच खूप आहे.

प्रश्न- आणि तू त्यातच खुश आहेस?

उत्तर- मी खूप जास्त खुश आहे. मी अशा लोकांपैकी एक आहे, जिला फक्त लांबूनच त्यांच्या सहवासाचा आनंद घेता येईल. मी का नकार देऊ, की मी त्यांच्यावर प्रेम करत नाही? अर्थातच मी खूप प्रेम करते.

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Aashna? (@reels_tube._)

रेखा त्यांच्या प्रेमाविषयी पुढे म्हणतात, “तुम्ही जगभरातील सर्व प्रेम घ्या आणि त्यात आणखी थोडं प्रेम समाविष्ट करा.. तेवढं प्रेम त्या व्यक्तीसाठी माझ्या मनात आहे.” या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. ज्या खरेपणानं रेखा प्रेमाविषयी व्यक्त झाल्या, ते पाहून चाहते त्यांचं कौतुक करत आहेत.

1976 मध्ये ‘दो अंजाने’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांना डेट करू लागले, असं म्हटलं जातं. त्याकाळी सर्व वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये अमिताभ आणि रेखा यांच्या कथित प्रेमप्रकरणाच्या बातम्या झळकत होत्या. त्यामुळे अमिताभ यांच्या घरी गोंधळ उडाला होता. या बातम्यांना कंटाळून जया यांनी रेखा यांना डिनरसाठी घरी बोलावलं होतं. त्यानंतर रेखा जयाजींच्या घरी गेल्या. जया यांनी रेखा यांचं आदरातिथ्य केलं, जेवू घातलं, संपूर्ण घर दाखवलं. त्यानंतर रेखा त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाल्या तेव्हा जया यांनी त्यांना सांगितले की, काहीही झालं तरी मी अमिताभजींना सोडणार नाही. (चाहे जो हो जाए, मैं अमिताभ को नहीं छोड़ूंगी.) हे ऐकून रेखा यांना धक्काच बसला होता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.