Marathi News Entertainment If I hit her she would not survive it When Salman Khan gave shocking reply to Aishwarya Rai domestic abuse claims
Salman Aishwarya | “तिच्यावर हात उचलला असता तर..”; ऐश्वर्याच्या आरोपांवर सलमान स्पष्टच बोलला
1998 मध्ये 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र 2002 मध्ये या दोघांचा ब्रेकअप झाला.
Aishwarya Rai and Salman KhanImage Credit source: Instagram
मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा काही जोड्या होत्या, ज्यांच्या अफेअरपेक्षा अधिक त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा चघळल्या गेल्या. अनेक वर्षांनंतरही या जोड्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. अशीच एक जोडी म्हणजे सलमान खानआणि ऐश्वर्या राय बच्चन. इंडस्ट्रीतील जवळपास 35 वर्षांच्या कारकिर्दीत सलमानचं बऱ्याच अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलंय. मात्र 1990 आणि 2000 दरम्यान त्याचं रिलेशनशिप सर्वाधिक चर्चेत होतं. अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबतचं त्याचं नातं त्यावेळी जगजाहीर होतं. मात्र ब्रेकअपनंतर ऐश्वर्याने सलमानवर काही गंभीर आरोप केले होते. सलमानने मारहाण केल्याचा दावा ऐश्वर्याने केला होता. आता बऱ्याच वर्षांनंतर सलमानचा एक जुना व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडीओत तो ऐश्वर्याच्या आरोपांविषयी बोलताना दिसत आहे.
2002 मध्ये बॉम्बे टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्या सलमानसोबतच्या ब्रेकअपविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. दारुच्या नशेत सलमानने हात उचलल्याचा दावा तिने केला होता. “मी त्याच्या वाईट काळात दारुच्या नशेतील गैरवर्तनाला सहन करत त्याच्या पाठिशी उभी राहिले. त्याबदल्यात मला त्याच्या गैरवर्तणुकीचा (शाब्दिक, शारीरिक आणि भावनिक), अपमानास्पद वागणुकीचा सामना करावा लागला. म्हणून इतर कोणत्याही स्वाभिमानी महिलांप्रमाणे मीसुद्धा त्याच्यासोबतचं नातं संपुष्टात आणलं”, असं ऐश्वर्या म्हणाली होती.
एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत सलमानला या आरोपांबद्दल प्रतिक्रिया देण्यास विचारण्यात आलं होतं. यावेळी ऐश्वर्याचा थेट उल्लेख केला नव्हता, मात्र तिच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्याला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सलमान म्हणाला, “आता जर महिलेनं असं म्हटलं असेल की मी हात उचलला होता, तर मी अजून काय बोलावं?” जेव्हा पत्रकाराने विचारलं की “तुला त्या विषयाच्या खोलात जायचं नाहीये का?” तेव्हा सलमानने उत्तर दिलं, “एका पत्रकाराने मला खूप आधी याबद्दल विचारलं होतं. तेव्हा मी टेबलवर माझा हात जोरात आपटला होता. तो टेबल तुटला की काय हे तो घाबरलेला पत्रकार पाहत होता. आता जर मी कोणाला मारलं असेल तर साहजिकच ते भांडणात असेल. मी तेव्हा प्रचंड रागात असेन. रागाच्या भरात जर मी माझा तिच्यावर उचलला तर मला वाटत नाही की ती जिवंत राहील. त्यामुळे आरोपांमध्ये काही तथ्य नाही.”
1998 मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र 2002 मध्ये या दोघांचा ब्रेकअप झाला.