टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांत महागडी अभिनेत्री; वयाच्या 19 व्या वर्षी एका दिवसाच्या शूटिंगसाठी घेते तब्बल इतकं मानधन

बिग बॉसच्या सोळाव्या सिझनमध्ये भाग घेतल्यानंतर सुम्बुलची एक वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर आली. आज ती टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तिने ही लोकप्रियता मिळवली आहे.

टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांत महागडी अभिनेत्री; वयाच्या 19 व्या वर्षी एका दिवसाच्या शूटिंगसाठी घेते तब्बल इतकं मानधन
सुम्बुल तौकिर खानImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 10:46 AM

मुंबई | 25 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री सुम्बुल तौकिर खानने स्टार प्लस वाहिनीवरील ‘ईमली’ या मालिकेत भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली. त्यानंतर ती बिग बॉसच्या सोळाव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली. या शोमध्ये सहभागी होणारी ती सर्वांत कमी वयाची स्पर्धक ठरली होती. मात्र लोकप्रियता पाहता तिने इतर स्पर्धकांपेक्षा जास्त मानधन घेतलं होतं. सुम्बुल आता 19 वर्षांची असून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. आता लवकरच ती ‘काव्या : एक जज्बा एक जुनून’ या सोनी टीव्हीवरील नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. मात्र याचसोबत मालिकेतील भूमिकेसाठी सुम्बुलने घेतलेल्या मानधनाचीही चर्चा होत आहे.

‘काव्या’ या मालिकेत सुम्बुल एका आयएएस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. एका रिपोर्टनुसार, सुम्बुलला या मालिकेच्या एका एपिसोडसाठी जवळपास 75 ते 80 हजार रुपये मानधन मिळत आहे. आपल्या दमदार अभिनयामुळे आणि लोकप्रियतेमुळे सुम्बुलला टीव्ही इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन मिळतंय. सुम्बुलने कमी वयात तिच्या करिअरची सुरुवात केली. ‘ईमली’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. या मालिकेत आधी तिची अभिनेता गश्मीर महाजनीसोबत जोडी होती. नंतर अभिनेता फहमान खानसोबतही तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडला.

हे सुद्धा वाचा

बिग बॉसच्या सोळाव्या सिझनमध्ये भाग घेतल्यानंतर सुम्बुलची एक वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर आली. आज ती टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तिने ही लोकप्रियता मिळवली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे पंधरा लाख फॉलोअर्स आहेत. काही दिवसांपूर्वीच सुम्बुलच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. या लग्नाचे फोटो सुम्बुलने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. बऱ्याच प्रयत्नांनंतर तिने दुसऱ्या लग्नासाठी वडिलांचा होकार मिळवला होता. एका मुलाखतीत तौकिर खान म्हणाले, “माझ्या दोघी मुली गेल्या काही वर्षांपासून दुसऱ्या लग्नासाठी माझ्या मागे लागल्या होत्या. अखेर माझ्या मोठ्या भावंडांनी आणि माझ्या मुलींनी या लग्नासाठी होकार मिळवला आहे.”

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.