13 वर्षांनी मोठ्या मित्राशी वडिलांनी तोडायला लावलं नातं; ‘ईमली’ फेम अभिनेत्रीचा व्हिडीओ चर्चेत

"तुम्हा सर्वांना माहीत आहे की गेल्या दोन आठवड्यांपासून मी निराश आहे. मी खरंच खूप दु:खी होते. मात्र मी ट्विटरवर अनेक चाहत्यांचे मेसेज पाहिले, ज्यांनी मला धीर दिला. तुम्हा सर्वांचे खूप आभार", असं ती या व्हिडीओत म्हणते.

13 वर्षांनी मोठ्या मित्राशी वडिलांनी तोडायला लावलं नातं; 'ईमली' फेम अभिनेत्रीचा व्हिडीओ चर्चेत
Sumbul Touqeer Khan and Fahmaan KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 04, 2023 | 2:39 PM

मुंबई : ‘ईमली’ या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री सुंबुल तौकीर खान आणि फहमान खान यांच्या नात्याची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. मालिकेतील या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. खऱ्या आयुष्यातही या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या मैत्रीत फूट पडल्याची चर्चा सुरू आहे. आता या चर्चांदरम्यान सुंबुलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. गेले दोन आठवडे खूप कठीण गेल्याचं ती या व्हिडीओत म्हणताना दिसतेय.

सुंबुलने शनिवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये ती अत्यंत निराश असल्याचं पहायला मिळालं. “तुम्हा सर्वांना माहीत आहे की गेल्या दोन आठवड्यांपासून मी निराश आहे. मी खरंच खूप दु:खी होते. मात्र मी ट्विटरवर अनेक चाहत्यांचे मेसेज पाहिले, ज्यांनी मला धीर दिला. तुम्हा सर्वांचे खूप आभार”, असं ती या व्हिडीओत म्हणते.

हे सुद्धा वाचा

काही दिवसांपूर्वी फहमानच्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सुंबुल आणि त्याच्या मैत्रीत सर्वकाही ठीक नसल्याचं त्याने म्हटलं होतं. एका म्युझिक व्हिडीओवरून दोघांमध्ये वाद सुरू झाला आहे आणि त्यामागचं कारण सुंबुलचे वडील असल्याचं म्हटलं जातंय.

सुंबुलने ‘इमली’ या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील मुख्य अभिनेता फहमान खान याच्याशी तिचं नाव जोडलं गेलं होतं. मात्र बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर सुंबुल आणि शालीन भनोत यांच्यामध्ये जवळीक वाढली होती.  तेव्हा “बिग बॉसच्या घरात वावरणारी ती माझी मुलगीच नाही”, अशी थेट प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी दिली होती. इतकंच नव्हे तर तिला बिग बॉसच्या घराबाहेर काढण्यासाठी मतं द्या, अशी विनंती त्यांनी चाहत्यांना केली होती.

“मी सुंबुलला अत्यंत सुरक्षित वातावरणात लहानाचं मोठं केलं. जेव्हा बिग बॉसची ऑफर आली, तेव्हा तिला ‘दुनियादारी’ कळावी म्हणून ही चांगली संधी असेल असं मला वाटलं होतं. मी किंवा सुंबुलने याआधी कधीच हा शो पाहिला नव्हता. त्यात असं काही होईल हेसुद्धा आम्हाला माहीत नव्हतं. मी माझ्या मुलीला बिग बॉसच्या घरात पाठवल्याचा मला पश्चात्ताप होतोय. तिची मदत करण्याऐवजी मी तिला दुखावलंय”, असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.