AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारक मेहताच्या ‘सोढी’बद्दल हैराण करणारी माहिती पुढे, मोठी खळबळ, बेपत्ता होण्याच्या आदल्या रात्री..

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसत आहे. तारक मेहता मालिकेतील कलाकारांची देखील सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. गेल्या काही वर्षांपासून अनेक कलाकारांनी मालिकेला सोडचिठ्ठी दिली आहे.

तारक मेहताच्या 'सोढी'बद्दल हैराण करणारी माहिती पुढे, मोठी खळबळ, बेपत्ता होण्याच्या आदल्या रात्री..
Gurucharan Singh
Follow us
| Updated on: Apr 27, 2024 | 1:18 PM

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत सोढीच्या भूमिकेतून सर्वांचे मनोरंजन करणारा अभिनेता अर्थात गुरुचरण सिंग याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. गुरुचरण सिंग हा बेपत्ता झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे. सर्वात हैराण करणारे म्हणजे अभिनेता गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे. अभिनेता नेमका कुठे आहे, याबद्दल कोणालाही काहीच कल्पना नाहीये. गुरुचरण सिंगची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आता नुकताच गुरुचरण सिंगबद्दल एक मोठी माहिती मिळताना दिसत आहे. ज्यानंतर त्याच्या चाहत्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे.

गुरुचरण सिंगच्या मित्राने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून गुरुचरण सिंगची तब्येत खराब होती. गुरुचरण सिंगच्या मित्राने म्हटले की, गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यापासून त्याचे आई वडिल चिंतेत असून त्यांनी दिल्लीमध्ये तक्रार देखील दाखल केलीये. पोलिस हे सध्या गुरुचरण सिंगचा शोध घेत आहेत. आम्ही सतत गुरुचरण सिंगच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहोत.

गुरुचरण सिंगच्या मित्राचे म्हणणे आहे की, दिल्लीला जाण्यापूर्वी त्याचा बीपी जास्त होता आणि त्याने काही तपासण्या देखील केल्या होत्या. हेच नाही तर दिल्लीला जाण्यापूर्वी त्याने जेवणही व्यवस्थित केले नव्हते. यामुळे चिंता अधिक वाढली आहे. गुरुचरण सिंगसोबत तारक मेहता मालिकेत मिसेस सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीला याबद्दल विचारण्यात आले.

जेनिफर मिस्त्री म्हणाली की, गेल्या काही दिवसांपासून मी गुरुचरण सिंगच्या संपर्कात नव्हते. गुरुचरण सिंग हा बेपत्ता झाल्याचे ऐकल्यापासून मला मोठा धक्काच बसला. गुरुचरण सिंग हा सुरक्षित घरी यावा. पुढे जेनिफर मिस्त्री म्हणाली की, जूननंतर आम्ही संपर्कात नव्हतो. जेनिफर मिस्त्री हिने देखील तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली आहे.

गेल्या काही वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेला कलाकार हे सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. हेच नाही तर जेनिफर मिस्त्री हिने तर थेट असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गुरुचरण सिंगने देखील मालिका सोडलीये. आजही गुरुचरण सिंगला लोक सोढी याच नावाने ओळखतात. गुरुचरण सिंग सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतो.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.