युगप्रवर्तक गायिका म्हणून 1978 मध्येच बहाल केली होती डीलिट पदवी, शिवाजी विद्यापीठाने म्हटले होते जगावर लतादीदींच्या सुरांचे साम्राज्य

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अलौकिक गायिकेला देश परदेशातून विविध पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आपल्या देशाने लतादींदीना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्काराने दिला आहेच पण लता मंगेशकर यांच्या कलेचा आदर म्हणून कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाने 21 नोव्हेंबर 1978 मध्येच डॉक्टर ऑफ लेटर्सने त्यांना गौरवण्यात आले होते. 

युगप्रवर्तक गायिका म्हणून 1978 मध्येच बहाल केली होती डीलिट पदवी, शिवाजी विद्यापीठाने म्हटले होते जगावर लतादीदींच्या सुरांचे साम्राज्य
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 3:34 PM

मुंबईः गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अलौकिक गायिकेला देश परदेशातून विविध पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आपल्या देशाने लतादींदीना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न (Bharatratna) पुरस्काराने दिला आहेच पण लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या कलेचा आदर म्हणून कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाने (Shivaji University) 21 नोव्हेंबर 1978 मध्येच डॉक्टर ऑफ लेटर्सने त्यांना गौरवण्यात आले होते.  तत्कालीन कुलगुरू डॉ. भा. शं. भणगे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आला होता. यावेळी लता मंगेशकर यांना एक गौरवपत्रही प्रदान करण्यात आले होते. या गौरवपत्रात त्यांच्या गायनाचा सन्मान करताना त्यांच्या बालपणापासून ते अगदी त्यांची 20 हजार गाणी रेकॉर्डींग करुन होईपर्यंतचा प्रवास त्यामध्ये मांडला होता. मास्टर दिनानाथ ते कानन मेहरुंनी त्यांच्या गायनाविषयी लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीचा उल्लेख त्यामध्ये करण्यात आला होता.

शिवाजी विद्यापीठाने डीलिट पदवी प्रदान करताना जे गौरवपत्र प्रदान केले होते. आजवर लतादींदीच्या कलेचा गौरव म्हणून अनेक संस्थांनी त्यांना गौरविले आहे. 1970 साली भारत सरकारने ‘पद्मभूषण’ ही पदवी त्यांना अर्पण केली. आंध्र प्रदेशातील तिरूपतीच्या पुरातन देवस्थानकडून ”आस्थाना विद्वान” ही दुर्मिळ पदवी त्यांना देण्यात आला तर सर्वाअधिक गीते ध्वनिमुद्रित करणारी थोर पार्श्वगायिका म्हणून ईएमआय कंपनीने त्यांना सुवर्ण ध्वनिमुद्रिका देऊन त्यांचा गौरव केला होता. अमेरिका, आफ्रिका, रशिया या देशांत त्यांनी आपले संगीत गायनाचे कार्यक्रम केले आहेत. लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये त्यांनी सादर केलेला कार्यक्रम हा आंतरराष्ट्रीय पातळीवर अविस्मरणीय व ऐतिहासिक ठरला होता. लता मंगेशकर यांनी चित्रपट गीताबरोबरच ज्ञानदेव, तुकाराम, गालिब, मीराबाई यांच्या रचनाही त्यांनी स्वरबद्ध केल्या आहेत.तसेच संस्कृत भगवद्गीतेचे अध्याय त्यांनी ध्वनिमुद्रित केले असून त्यांनी शीख समाजाचा ‘सबद’ ही त्यांनी ध्वनिमुद्रित केली होती.

दिग्गजांकडून युगप्रवर्तक गायिकेचा गौरव

शिवाजी विद्यापीठाने त्यांना डीलिट पदवी प्रदान केली तेव्हा, त्यांना प्रदान करण्यात आलेल्या गौरवपत्रात मास्टर दीनानाथ, बालगंधर्व, भालजी पेंढारकर, भाऊसाहेब खांडेकर म्हणजेच वि. स. खांडेकर, कानन मेहरू या सारख्या दिग्गजांनी लतादीदींच्या गाण्याविषयी काढलेल्या गौरवौद्गराचे अनेक संदर्भ या गौरवपत्रात दिले आहेत. लतादीदींच्या गाण्याविषयी गौरवपत्रात उल्लेख करतानाच युगप्रवर्तक गायिकेचा सन्मान करण्याची संधी आज आम्ही घेत आहोत असा स्पष्ट उल्लेख शिवाजी विद्यापीठाने केला होता.

संबंधित बातम्या

Lata Langeshakar : बालपणीची हेमा ते भारतरत्न लता मंगेशकर, पहा दिदींचे कधीही न पाहिलेले फोटो

Lata Mangeshkar Nidhan | दीदी गेल्या, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, देशावर शोककळा

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...