Atique Ahmed | अतीफ – अशरफ यांच्या हत्याकांडावर सिनेमा बनवण्यासाठी ‘हा’ दिग्दर्शक सज्ज!

बॉलिवूडमध्ये अनेक गुंडांच्या आयुष्यावर सिनेमा साकारण्यात आला, आता अतीफ - अशरफ यांच्या हत्याकांडावर येणार सिनेमा? सध्या सर्वत्र अतीफ - अशरफ यांचीच चर्चा

Atique Ahmed | अतीफ - अशरफ यांच्या हत्याकांडावर सिनेमा बनवण्यासाठी 'हा' दिग्दर्शक सज्ज!
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 3:42 PM

मुंबई : आरोपी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर येताच सर्वत्र खळबळ माजली आहे. पोलिसांसमोर अतिक आणि अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दोघांची ज्याप्रकारे हत्या करण्यात आली, ती घटना एखाद्या सिनेमातील कथेपेक्षा कमी नाही. अतिक आणि अशरफ यांच्या हत्येनंतर सर्वत्र खळबळ माजली असताना या धक्कादायक घटनेवर सिनेमा बनवण्याची निर्माते आणि दिग्दर्शकांची तयारी सुरु झाली आहे. याआधी देखील अनेक गँगस्टरच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये खऱ्या आयुष्यातील अनेक गुंडांवर चित्रपट बनले आहेत… ‘कंपनी’, ‘हसिना पारकर’, ‘शूटआउट अॅट वडाळा’, ‘डी डे’, ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई…’ असे अनेक सिनेमे आहेत ज्यांच्यामाध्यमातून खाऱ्या आयुष्यातील गुंडांचं जीवनपट मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केले. आता अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या या घटनेलाही सिनेमाचं रूप मिळू शकते.

अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या हत्येनंतर आव्हान स्वीकारणारे दिग्दर्शक दोघांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करु शकतात. प्रसिद्ध आरुषी खून प्रकरणावरही एक सिनेमा बनवण्यात आला होता. तर अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या हत्येनंतर कोणता दिग्दर्शक सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी तयार होईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

अशात दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचं नाव समोर येत आहे. अनुराग कश्यप याने गुंडांच्या आयुष्यावर अधारित अनेक सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. शिवाय सत्य आणि शूल सारख्या उत्कृष्ट चित्रपटांच्या पटकथा देखील अनुराग कश्यप यांनी लिहिल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार; शनिवारी रात्री १० वाजता पोलिसांचं पथक अतिक अहमद आणि अशरफ यांना प्रयागराजमधील कोल्विन रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. दरम्यान, पत्रकार म्हणून पोचलेल्या तीन हल्लेखोरांनी दोघांवर गोळीबार केला. या हल्ल्यात अतिक आणि अशरफ या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस सध्या याप्रकरणी चौकशी करत आहेत.

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.