AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Idol 12मध्ये परीक्षक म्हणून हजेरी, आता अभिजित भट्टाचार्यने कार्यक्रमाबद्दल केलं मोठं वक्तव्य!

‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) हा लोकप्रिय टीव्ही शो सध्या खूप चर्चेत आला आहे. शोबद्दल बरेच वादंग निर्माण झाले आहेत. विशेषत: किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी या शोबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर हा शो बराच चर्चेत आला आहे.

Indian Idol 12मध्ये परीक्षक म्हणून हजेरी, आता अभिजित भट्टाचार्यने कार्यक्रमाबद्दल केलं मोठं वक्तव्य!
इंडियन आयडॉल 12
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 4:04 PM

मुंबई : ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) हा लोकप्रिय टीव्ही शो सध्या खूप चर्चेत आला आहे. शोबद्दल बरेच वादंग निर्माण झाले आहेत. विशेषत: किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी या शोबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर हा शो बराच चर्चेत आला आहे. अमित कुमार म्हणाले होते की, शोच्या निर्मात्यांनी त्यांना स्पर्धकांचे कौतुक करण्यास सांगितले होते. मग, त्यांचे सादरीकरण कसेही असेल तरी… आता शेवटच्या भागात परीक्षक म्हणून आलेल्या गायक अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) यांनी या शोबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे (Indian Idol 12 Abhijeet Bhattacharya talks about show controversy).

अभिजीत भट्टाचार्य याबद्दल बोलताना म्हणाले की, अमितच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. त्याचे विधान वेगळे होते. मात्र, त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला.

वाद नाहीच!

अभिजीतने पीपिंग मूनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘कोणताही वाद झालेलाच नाही. त्या घटनेनंतर मी स्वतः अमित कुमारांशी बोललो. सर्वप्रथम, अमित कुमार यांनी हे विधान कॅमेर्‍यासमोर केलेलं नाही. कोणताही व्हिडीओ किंवा कोणताही ऑडिओ नव्हता. लोकांनी प्रिंट मीडियाने जे सांगितले त्यावर विश्वास ठेवला. त्याचे शब्द अतिशयोक्तीपूर्ण आहेत. मात्र, चुकीचा अर्थ लागल्यामुळे खळबळ उडाली आहे.’

स्पर्धकांचे कौतुक करताना अभिजीत भट्टाचार्य म्हणाला की, ‘शोमध्ये अनेक प्रतिभावान स्पर्धक आहेत. प्रत्येकाचे गायन खूप चांगले आहे.’ मात्र, या शोबद्दल आतापर्यंत अनेक गायक आणि माजी न्यायाधीश आणि शोच्या माजी स्पर्धकांची विधाने समोर आली आहेत (Indian Idol 12 Abhijeet Bhattacharya talks about show controversy).

सुनिधी चौहान

सुनिधि चौहान यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, ती या शोचे परीक्षक पद का स्वीकारत नाही. सुनिधी या शोमध्ये न्यायाधीश म्हणून एकदा दिसली देखील होती. परंतु, त्यानंतर ती या शोपासून दूर गेली. या कार्यक्रमाचे परीक्षण न करण्याबद्दल बोलताना सुनिधी म्हणाली, असे नाही की आम्हाला प्रत्येकाचे कौतुक करायला सांगितले गेले, परंतु हो, आम्हाला प्रशंसा करण्यास सांगितले होते. मला ते करायचे नव्हते म्हणूनच मी हा शो सोडला.

मियांग चँग

या कार्यक्रमाबद्दलच्या वादावर बोलताना मियांग चँग म्हणाला होता की, आमचा सीझन अगदी साधा होता. आमच्या वेळी इतके ग्लॅमर नव्हते आणि इतके सोशल मीडिया एक्सपोजर नव्हते. बरं, प्रत्येकाला हे माहित आहे की, हा ड्रामा रिअॅलिटी शोमध्ये होतोच.

अभिजित सावंत

अभिजीतने सांगितले होते की, शोमध्ये स्पर्धकांच्या प्रतिभेऐवजी ते किती गरीब आहेत ते जास्त बघतात आणि त्यांच्या गरीबीची कहाणी हायलाइट करतात.

(Indian Idol 12 Abhijeet Bhattacharya talks about show controversy)

हेही वाचा :

Nisha-Karan Mehra | करण-निशाच्या वादानंतर सोशल मीडियावर चर्चेत आलाय ‘हा’ बेडरूम व्हिडीओ ! 

‘आई-बाबा कधी बनणार?’, कुटुंब नियोजनाच्या प्रश्नावर मिलिंद सोमणची पत्नी अंकिता कोंवरचं बेधडक उत्तर!

पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण...
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण....
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्.
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार.
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय.
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?.
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात.
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य.
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच.