Indian Idol : TRP साठी करावं लागतं स्पर्धकांचं खोटं कौतुक; सुनिधी चौहानचा मोठा खुलासा
सुनिधीनं आपल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे की निर्माते सांगतील त्या गोष्टी आपण करू शकत नाही त्यामुळे इंडियन आयडॉल सोडलं. (Indian Idol: False appreciation of contestants for TRP; Sunidhi Chauhan's big revelation)
मुंबई : गेले अनेक दिवस इंडियन आयडल 12 (Indian Idol 12) या शोबाबत वाद वाढतच आहेत. अमित कुमार, अभिजीत सावंत, सोनू निगम आणि आता गायिका सुनिधी चौहाननं (Sunidhi Chauhan) ही शोबद्दल मोठे खुलासे केले आहेत. सुनिधी चौहाननं आपल्या एका मुलाखतीत इंडियन आयडॉलमधील जजचं पद का सोडलं हे सांगितलं आहे.
‘निर्माते सांगतील त्या गोष्टी मी करू शकत नाही’
सुनिधीनं आपल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे की निर्माते सांगतील त्या गोष्टी आपण करू शकत नाही त्यामुळे इंडियन आयडॉल सोडलं. आपला विचार बाजूला ठेवून स्पर्धकांचं कौतुक करण्यास सांगितलं गेलं असंही सुनिधीनं सांगितलं. सुनिधी चौहाननं इंडियन आयडॉलच्या 5 आणि 6 सीझनला जज केलं होतं. जेव्हा सुनिधीला कार्यक्रमाबद्दल विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी हे सर्व करण्यात येतं. यात स्पर्धकांचा कोणताही दोष नाही. असंही ती म्हणाली. जेव्हा स्पर्धक फक्त कौतुक ऐकतात, तेव्हा ते गोंधळतात आणि अशा परिस्थितीत खरं टॅलेंट खराब होते.
‘या खेळाचं नाव टीआरपी…’
सर्वसाधारणपणे रिअॅलिटी शोविषयी बोलताना सुनिधी चौहाननं सांगितलं की, ‘संगीतात नाव कमावण्याचं स्वप्न पाहणा्यांना मोठा व्यासपीठ मिळाला आहे. मात्र कलाकारांचं यात नुकसान झालं आहे कारण टीव्हीवर आपली कथा दाखवून लोकांना रात्रभरात फेम मिळत आणि काहीतरी करण्याची त्यांची आवड संपते.’ सुनिधी पुढे म्हणाली, ‘हो, काही लोक अजूनही कठोर परिश्रम करतात. मात्र अचानक मिळालेल्या फेमचा त्यांच्या मनावर प्रभाव पडतो. यात स्पर्धकांचा कोणताही दोष नाही, कारण या खेळाचं नाव टीआरपी आहे.
स्पर्धकांच्या गाण्यात सुधारणा
सुनिधी चौहाननं सांगितले की शोमधील काही स्पर्धकांचं गाण्यात सुधारणा करण्यात येते. म्हणजेच काही गायकांना कधीकधी गाताना किंवा रेकॉर्डिंग करताना अडचण येते, जे शो प्रसारित होण्यापूर्वी दुरुस्त केली जाते.
सुनिधीनं सांगितलं की तिनं इंडियन आयडॉल, दिल है हिंदुस्तानी आणि द वॉइस सारख्या शोसाठी जजची भूमिका साकारली आहे. ती म्हणाली की आजही मी मनापासून जे बोलते तेच सांगेन. हे शोच्या निर्मात्यांना मी शोमध्ये हवी आहे की नाही यावर अवलंबून आहे.
संबंधित बातम्या
Photo : ‘कोरोना रिकव्हरी फार सोप्पी नाही…’, मलायका अरोराकडून कोरोनाकाळातील अनुभव शेअर
Photo : आता अनिल कपूरची भाचीही चर्चेत; शनाया कपूरच्या ‘या’ फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ