Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Idol होस्ट आदित्य नारायण नेहमीच अडकलाय वादाच्या भोवऱ्यात, वाचा आदित्य-वादांच्या समीकरणाबद्दल…

सोनी टीव्हीच्या ‘इंडियन आयडॉल 12’ (Indain Idol 12) सोबतच या कार्यक्रमाचा होस्ट आदित्य नारायणही (Aditya Narayan) अध्या खूप चर्चेत आहे. आता असे देखील बोलले जात आहे की, आदित्यचे आणि वादांचे एक खास समीकरणच बनले आहे.

Indian Idol होस्ट आदित्य नारायण नेहमीच अडकलाय वादाच्या भोवऱ्यात, वाचा आदित्य-वादांच्या समीकरणाबद्दल...
आदित्य नारायण
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 1:04 PM

मुंबई : सोनी टीव्हीच्या ‘इंडियन आयडॉल 12’ (Indain Idol 12) सोबतच या कार्यक्रमाचा होस्ट आदित्य नारायणही (Aditya Narayan) अध्या खूप चर्चेत आहे. आता असे देखील बोलले जात आहे की, आदित्यचे आणि वादांचे एक खास समीकरणच बनले आहे. दिग्गज गायक किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांची थट्टा केल्यावर, आता आदित्य नारायण याने अलिबागबद्दल वादग्रस्त विधान केले होते (Indian Idol host Aditya Narayan And his controversies).

अलिबाग विधाननंतर त्याला हात जोडून जाहीर माफी मागावी लागली होती. तसे, आदित्यचे वादांचे हे समीकरण अजिबात नवे नाही. परंतु, कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

विमानतळावर निर्माण झाला वाद

2017 मध्ये आदित्य नारायण (आदित्य नारायण) याने रायपूर विमानतळावर वाद घटल होता, तर दुसरीकडे त्याने एकदा बारमध्ये जाऊनही गोंधळ घातला होता. आदित्य नारायण (आदित्य नारायण) याने रायपूर विमानतळवर कर्मचार्‍यांना कपडे उतरवण्याची धमकी दिली होती. हे सर्व प्रकरण अधिकच्या सामानावरून निर्माण झाले होते. जास्त सामानाच्या बदल्यात कर्मचार्‍यांनी त्याला 13000 रुपये जमा करण्यास सांगितले. त्यावर आदित्यने चिडून वादावादी घालण्यास सुरुवात केली आणि सांगितले की मी 10000\ रुपयांहूनही अधिक पैसे देणार नाही. स्टाफसोबतच्या या वादाचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता.

मुलीने मारली कानाखाली?

2011मध्ये आदित्य नारायण आणखी मोठ्या वादात अडकला होता. त्यांने आणि त्याच्या मित्रांनी मद्यधुंद अवस्थेत एक बारमध्ये गोंधळ घातला होता. तिथे उपस्थित एका मुलीशी देखील वाद घातला होता. त्यावेळी अशीही बातमी आली होती की, त्या मुलीने आदित्यला कानाखाली देखील मारली होती. परंतु आदित्य म्हणाला की, तो आपल्या मित्रांसह बारमध्ये गेला, तेथे वाद झाला, परंतु हे प्रकरण कोणत्याही मुलीशी संबंधित नव्हते किंवा त्याला मारहाणही झाली नाही. आता सत्य काय होते, हे फक्त आदित्यलाच माहित! (Indian Idol host Aditya Narayan And his controversies)

पोलिसांनी केली अटक

2018 मध्ये आदित्य नारायण याला वेगाने गाडी चालवत ऑटो रिक्षाला धडक दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. वर्सोवा पोलिसांनी या प्रकरणी आदित्यला अटक देखील केली होती. रिक्षात बसलेल्या महिलेने आदित्य नारायणविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, या प्रकरणात आदित्य पळून गेला नाही, तर त्या महिलेस आणि रिक्षाचालकास रुग्णालयात घेऊन गेला होता.

नेहासोबत लग्नाचे नाटक

आदित्य नारायण त्याच्या खासगी आयुष्यातील या घटनांमुळेच नव्हे, तर त्याच्या व्यावसायिक जीवनामुळे देखील चर्चेत राहीला आहे. ‘इंडियन आयडॉल 11’च्या दरम्यान आदित्य नारायणने नेहासोबत लग्नाचे नाटक देखील केले होते. शोच्या स्टेजवरच तो नेहा कक्करशी लग्न करणार असल्याची बातमी पसरली होती. यानंतर चाहते देखील खूप उत्साही झाले होते. मात्र, नंतर हा खुलासा झाला की हा केवळ टीआरपीचा खेळ होता.

(Indian Idol host Aditya Narayan And his controversies)

हेही वाचा :

PHOTO | मॉरीशसपासून ते टोरंटोपर्यंत, भारतच नाही तर जगातील ‘या’ देशातही अक्षय कुमारचे आलिशान बंगले!

Indian Idol 12 | षण्मुखप्रियासह तिच्या आईचे ट्रोलर्सना धडधडीत उत्तर, मायकल जॅक्सनचं उदाहरण देत म्हणाल्या…

देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...