अभिनेत्रीकडून Indian Idol ची पोलखोल; टीआरपीसाठी सूत्रसंचालकाला निर्मात्यांकडून दिल्या जातात ‘या’ सूचना

याआधी दिग्गज गायक किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार यांनीसुद्धा शोवर आरोप केले होते. अमित कुमार यांना शोमध्ये विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्यातील स्पर्धकांची प्रशंसा करण्यास त्यांना सांगितलं गेल्याची तक्रार त्यांनी केली होती.

अभिनेत्रीकडून Indian Idol ची पोलखोल; टीआरपीसाठी सूत्रसंचालकाला निर्मात्यांकडून दिल्या जातात 'या' सूचना
Indian IdolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 10:12 AM

मुंबई : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘इंडियन आयडॉल’वरून बऱ्याचदा वाद निर्माण झाला. टीआरपीसाठी हा शो स्क्रिप्टेड केल्याचा आणि त्यात विनाकारण ड्रामा दाखवल्याचा आरोप आजवर बऱ्याच कलाकारांनी केला आहे. आता या शोची सूत्रसंचालक म्हणून काम केलेली अभिनेत्री मिनी माथुरने शोबद्दल काही आश्चर्यकारक खुलासे केले आहेत. मिनी माथुरने इंडियन आयडॉलच्या सहा सिझनमध्ये सूत्रसंचालक म्हणून काम केलं आहे. मात्र नंतर तिने अचानक या शोचा निरोप घेतला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने शो सोडण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे. त्याचसोबत ‘इंडियन आयडॉल’ हा स्क्रिप्टेड शो असल्याचंही तिने म्हटलंय.

“इंडियन आयडॉल स्क्रिप्टेड”

“या शोमधील सर्व स्पर्धकांशी माझी खूप चांगली मैत्री झाली होती. मी त्यांना माझ्या घरी जेवायलाही बोलवायची. मी तासनतास त्यांच्यासोबत वेळ घालवला होता. पण नंतर हळूहळू माझ्या लक्षात आलं की या रिॲलिटी शोमध्ये काहीच रिॲलिटी शिल्लक राहिली नाही. हा शो फक्त पैसे कमावण्यावर भर देत होता. जी रिॲलिटी अस्तित्वातच नाही, ती निर्माण केली जाऊ लागली. प्रेक्षकांसाठी हा शो स्क्रिप्टेट करण्यात आला होता”, असा खुलासा मिनीने केला.

निर्मात्यांकडून सूत्रसंचालकाला दिल्या जातात सूचना

शोमधील एक प्रसंग आठवत ती पुढे म्हणाली, “एकदा या शोमध्ये स्पर्धकांचे नातेवाईक येणार होते. आपल्या घरातील कोणती व्यक्ती शोमध्ये येणार आहे, हे प्रत्येक स्पर्धकाला माहीत होतं. तरीसुद्धा त्यांना कॅमेरासमोर आश्चर्यकारक प्रतिक्रिया देण्यास सांगितलं गेलं होतं. इतकंच नाही तर माझ्या निर्मात्यांनी मला सांगितलं की हेमा मालिनी आणि धर्मेंद्रजी येणार आहेत, त्या दोघांचे खास क्षण आपल्याला निर्माण करायचे आहेत. मी म्हटलं, असे क्षण निर्माण केले जातात की ते आपोआप घडतात? अशा गोष्टी मी करण्यास तयार नव्हते.”

हे सुद्धा वाचा

अमित कुमार यांनीही केले होते आरोप

याआधी दिग्गज गायक किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार यांनीसुद्धा शोवर आरोप केले होते. अमित कुमार यांना शोमध्ये विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्यातील स्पर्धकांची प्रशंसा करण्यास त्यांना सांगितलं गेल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्याचसोबत स्पर्धकांबद्दल काहीच नकारात्मक बोलू नका, अशीही सूचना त्यांना देण्यात आली होती. प्रसिद्धी गायिका सुनिधी चौहाननेही हीच तक्रार केली होती.

शो स्क्रिप्टेड असल्याच्या आरोपांवर हिमेश रेशमियाचं उत्तर

इंडियन आयडॉल हा शो स्क्रिप्टेड असल्याच्या आरोपांवर संगीतकार-गायक हिमेश रेशमियाने उत्तर दिलं होतं. “तुम्ही जेव्हा एखाद्या नोकरीसाठी मुलाखत देता, तेव्हा तुमचं नाव, पत्ता, आधी कुठे काम केलं हे सर्व सांगता. का सांगता? नोकरी देणारासुद्धा हे सगळं विचारतो. तर मग प्रेक्षकांना एखाद्या स्पर्धकाचा बॅकग्राऊंड काय आहे हे जाणून घ्यायचा हक्क असू नये का? तुम्ही माणसातून भावना आणि सहानुभूती काढून टाका, तुम्ही दगड बना”, असं तो म्हणाला होता.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.