घटस्फोटानंतर लेकीकडे वळूनही…, पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप, अभिनेता म्हणाला…
नवरा करत होता फसवणूक, पण लग्न वाचवण्याच्या प्रयत्नात होती अभिनेत्री, घटस्फोटानंतर लेकीकडे त्याने वळूनही पाहिलं नाही..., पूर्व पत्नीने गंभीर आरोप केल्यानंतर अभिनेता म्हणाला...

झगमगत्या विश्वात सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेता आणि अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. ज्यांनी लग्नाच्या 14 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाला 14 वर्ष आणि मुलगी 13 वर्षांची असताना दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्फोटानंतर अभिनेत्री पूर्व पतीवर गंभीर आरोप देखील केले. ज्यावर अभिनेत्याने देखील त्याच्या खास अंदाजात उत्तर दिलं आहे.
सध्या ज्या सेलिब्रिटींच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. त्या अभिनेत्याचं नाव इंद्रनील सेनगुप्ता आणि अभिनेत्री बरखा बिष्ट आहे. 2008 मध्ये इंद्रनील आणि बरखा यांचा घटस्फोट झाला. लग्नाच्या 14 वर्षांनंतर इंद्रनील आणि बरखा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.




इंद्रनील आणि बरखा यांना एक मुलगी देखील आहे. घटस्फोटानंतर बरखा सिंगल मदर म्हणून मुलीचा सांभाळ करते… असं देखील अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलं. काही दिवसांपूर्वी झालेल्या मुलाखतीत बरखाने दावा केला होता की, घटस्फोटानंतर इंद्रनील कधी मुलीकडे वळून देखील पाहिलं नाही. ती एकटी मुलीचा सांभाळ करत आहे.
घटस्फोटानंतर इंद्रनील मुलीच्या आयुष्यातून देखील गायब झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मुलगी तिच्या वडिलांना भेटली नसल्याचा दावा देखील बरखा हिने केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बरखा आणि इंद्रनील यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
बरखा हिने केलेल्या अरोपांवर इंद्रनील याने सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. पूर्व पत्तीने केलेल्या आरोपांनंतर इंद्रनील याने लेकीसोबत काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये अभिनेता त्याच्या लेकीसोबत वेळ व्यतीत करताना दिसत आहे.
View this post on Instagram
एवढंच नाही तर, इंद्रनीलने लेकी सोबत हॉटेलमध्ये बसलेल्याचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये Unplanned twinning असं लिहिलं आहे. अभिनेत्याच्या पोस्टवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. लेकीसोबत फोटो पोस्ट करत इंद्रनील याने पूर्व पत्नीने कालेले दावे खोटे ठरवले आहेत. सध्या सर्वत्र इंद्रनीलच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.