‘ज्या शमीला दिवस – रात्र गोळ्या द्यायची, आज त्याच्याच…’, क्रिकेटरच्या पूर्व पत्नीवर का संतापले नेटकरी?
घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पूर्वी पत्नी जगतेय आलिशान आयुष्य, पण तिच्यावर का संतापले नेटकरी? म्हणाले, 'ज्या शमीला दिवस - रात्र गोळ्या द्यायची, आज त्याच्याच...', शमीची पूर्व पत्नी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

Mohammed Shami EX Wife Hasin Jahan: भारतील क्रिकेटसंघाचा दमदार क्रिकेटपटू मोहम्मद शमी त्याच्या सामन्यांपेक्षा कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. शमी याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर देखील शमीची पूर्व पत्नी हसीन जहाँ कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत हसीन अनेकांचं लक्ष वेधण्याचं काम करत असते. सोशल मीडियावर हसीन हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
आता देखील हसीन हिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये हसीन एका कार समोर उभी राहून पोज देताना दिसत आहे. हसीन हिचा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. सध्या हसीन हिची नवीन पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.




View this post on Instagram
हसीन जहां हिची सोशल मीडियावर पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एक नेटकरी हसीन हिच्यावर निशाणा साधत म्हणाला, ‘फोटोमध्ये शमी कुठे आहे?’ दुसरा नेटकरी म्हणाली, ‘कार देखील शमी भाईची असेल…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ज्या शमीला दिवस – रात्र गोळ्या द्यायची आज त्याच्याच पैशांवर आयुष्य जगत आहे…’ अशा कमेंट करत हसीनला नेटकरी ट्रोल करत आहेत.
मोहम्मद शमी आणि हसील जहां यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
रिपोर्टनुसार, हसीन हिने शमीवर गंभीर आरोप केले. ज्यामुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर शमी पूर्व पत्नी हसीन हिला प्रत्येक महिन्याला 1 लाख 30 हजार रुपये खर्च देतो. हसीन आणि शमी यांना एक मुलगी असून मुलीची कस्टडी हसीन हिच्याकडे आहे. हसीन जहाँ एक मॉडेल आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. मॉडेलिंगच्या माध्यमातून हसीन जहाँ गडगंज पैसा कमावते.