आलिया ही पूजा भट्ट-महेश भट्ट यांची मुलगी? प्रश्नावर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन

अभिनेत्री पूजा भट्ट नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याविषयी व्यक्त झाली. यावेळी तिला आलिया ही तुझी आणि महेश भट्ट यांची मुलगी आहे, अशी अफवा असल्याचं सांगितलं गेलं. त्यावर ती म्हणाली..

आलिया ही पूजा भट्ट-महेश भट्ट यांची मुलगी? प्रश्नावर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
आलिया भट्ट, पूजा भट्ट आणि महेश भट्टImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 13, 2023 | 10:01 AM

मुंबई | 13 सप्टेंबर 2023 : बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनमध्ये भाग घेतल्यापासून अभिनेत्री पूजा भट्ट सतत चर्चेत आहे. या रिअॅलिटी शोमध्ये तिचा बिनधास्त अंदाज प्रेक्षकांना खूप आवडला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजा तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. या मुलाखतीत पूजाला तिची सावत्र बहीण आलिया भट्टविषयीच्या अफवेविषयी विचारण्यात आलं. आलिया ही तुझी आणि महेश भट्ट यांची मुलगी आहे, या अफवेबद्दल तुला माहित आहे का, असा सवाल तिला करण्यात आला. त्यावर तिने सडेतोड उत्तर दिलं आहे. पूजाने या चर्चांना ‘मूर्खपणा’ असल्याचं म्हटलंय. त्याचसोबत कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत नाव जोडणं जणू आजकाल फॅशनच झालंय, असंही ती म्हणाली.

पूजा भट्टचं उत्तर

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या या मुलाखतीत पूजा म्हणाली, “आपल्या देशात ही फार जुनी गोष्ट आहे. एखाद्याचं त्याच्या मुलीसोबत किंवा वहिनीसोबत किंवा बहिणीसोबत रिलेशनशिप असल्याची चर्चा करणं काही नवीन नाही. अशा चर्चांना तुम्ही कसं रोखू शकणार? त्यावर प्रतिक्रिया देऊन त्या गोष्टीला अधिक महत्त्व द्यावं का? हे मूर्खपणाचं आहे.” काही वर्षांपूर्वी जेव्हा अभिनेत्री आलिया भट्टने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती, तेव्हा तिलासुद्धा असाच प्रश्न विचारण्यात आला होता. ‘तुझ्याबद्दल ऐकलेली सर्वांत विचित्र अफवा कोणती’, असं विचारलं असता आलिया म्हणाली, “मी महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांची मुलगी आहे.”

पूजा भट्ट ही महेश भट्ट आणि त्यांची पहिली पत्नी किरण भट्ट यांची मुलगी आहे. तर आलिया आणि पूजा या सावत्र बहिणी आहेत. आलिया ही महेश भट्ट आणि सोनी राजदान यांची मुलगी आहे.

हे सुद्धा वाचा

महेश भट्ट यांच्यावरून ट्रोलिंग

काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पूजाने एक फोटो पोस्ट केला होता. त्यावर एका युजरने 70 च्या दशकातील अभिनेत्री परवीन बाबीसोबत महेश भट्ट यांच्या रिलेशनशिपचा उल्लेख केला. संबंधित ट्रोलरने लिहिलं, ‘तुझे वडील कहाण्या ऐकवत आहेत की परवीन बाबी विवस्त्र होऊ अंधाऱ्या रात्री त्यांच्या मागे धावली होती. तुम्ही हे सुनिश्चित करू शकाल का, की महेश भट्ट यांनी त्यांच्या अहंकाराला संतुष्ट करण्यासाठी कधी तुझा शारीरिक वापर केला नाही. हा अजब विरोधाभास आहे. लोक स्वत:च्या अहंकारासाठी दुसऱ्यांच्या भावनांचा वापर करतात आणि त्यानंतर स्वतंत्रपणे स्वत:ला देवाचा पुत्र म्हणत फिरतात.’

ट्रोलरच्या या कमेंटवर पूजा भट्टने सडेतोड उत्तर दिलं आहे. तिने लिहिलं, ‘देव तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुम्हाला त्या आंधळ्या द्वेषापासून वाचवू दे जो तुम्ही पसरवू इच्छित आहात. माझ्या शुभेच्छा आहेत की तुम्ही सर्वांत चांगले व्यक्ती बना.’ पूजाची ही कमेंट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.