लग्नानंतरही अंकिता लोखंडे सुशांतच्या प्रेमात? मित्राची प्रतिक्रिया चर्चेत

जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूतचा ब्रेकअप झाला होता. आता बिग बॉसच्या घरात अंकिता अनेकदा सुशांतबद्दल बोलताना दिसते. त्यामुळे लग्नानंतरही ती त्याला आणि त्याच्या प्रेमाला विसरू शकली नाही, असं नेटकरी म्हणतायत.

लग्नानंतरही अंकिता लोखंडे सुशांतच्या प्रेमात? मित्राची प्रतिक्रिया चर्चेत
अंकिता लोखंडे, सुशांत सिंह राजपूत
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 3:25 PM

मुंबई : 29 डिसेंबर 2023 | ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेनं ‘बिग बॉस 17’ या शोमध्ये पती विकी जैनसोबत सहभाग घेतला. बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी हे दोघं एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसायचे. सोशल मीडियावर अंकिता-विकीमधील प्रेम पहायला मिळायचं. मात्र शोमध्ये सहभागी झाल्यापासून या दोघांमध्ये सतत भांडणं होत आहेत. कधी-कधी ही भांडणं इतकी टोकाची असतात, की त्यात घटस्फोटाचाही उल्लेख होतो. याशिवाय अंकिताच्या बाबतीत निदर्शनास आलेली आणखी एक गोष्ट म्हणजे बिग बॉसच्या घरात सतत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा सतत केला जाणारा उल्लेख. अंकिता कधी त्याच्या आठवणी सांगते, तर कधी त्याच्यासोबतच्या ब्रेकअपची कारणं. मात्र तिच्या तोंडी सुशांत हे नाव अनेकदा ऐकायला मिळालं. त्यामुळे लग्नानंतरही अंकिता सुशांतच्या प्रेमाला विसरू शकली नाही का, असा प्रश्न चाहत्यांना पडतोय. यावर आता सुशांत आणि अंकिताच्या एका मित्राने प्रतिक्रिया दिली आहे.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत एकत्र काम करताना अंकिता आणि सुशांत एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर जवळपास सहा वर्षे हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते. ब्रेकअप झाल्यानंतरही सुशांत परत येण्यासाठी प्रतीक्षा केली होती, असंही अंकिताने सांगितलं होतं. आता बिग बॉसच्या घरात सतत सुशांतचं नाव घेतल्याने अंकिताला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. अंकिताला प्रेक्षकांची सहानुभूती हवी आहे, म्हणूनच ती सतत सुशांतच्या गोष्टी सांगतेय, असं नेटकरी म्हणतायत.

हे सुद्धा वाचा

अंकिता आजसुद्धा सुशांतवर प्रेम करते, म्हणूनच सतत त्याच्या आठवणी सांगत असते, असंही अनेकांनी म्हटलंय. आता यावर अंकिता आणि सुशांतचा जवळचा मित्र संदीह सिंहने दिलं आहे. ‘टेलीचक्कर’ला दिलेल्या मुलाखतीत संदीपला अंकिताविषयी प्रश्न विचारण्यात आला. “अंकिता तिच्या आयुष्यात अजूनही मूव्ह ऑन झाली नाही का”, असा सवाल ऐकल्यानंतर संदीप काही सेकेंदांपर्यंत गप्प राहिला. त्यानंतर तो म्हणाला, “अंकिता आणि विकीचं आता लग्न झालंय. ती बिग बॉसच्या घरात खुश आहे. त्यामुळे मला याविषयी काही बोलायचं नाहीये.”

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.