Salman Khan | सैफ अली खानच्या मुलाला नाही तर ‘या’ डान्सरला डेट करतेय पलक तिवारी? सलमान खानकडून पोलखोल

पलक तिवारी ही प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे. पलकने याआधी सलमानच्या 'अंतिम' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. आता 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात ती भूमिका साकारतेय.

Salman Khan | सैफ अली खानच्या मुलाला नाही तर 'या' डान्सरला डेट करतेय पलक तिवारी? सलमान खानकडून पोलखोल
Palak Tiwari, Raghav Juyal and Salman KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 8:42 AM

मुंबई : सलमान खानच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. या कार्यक्रमाला चित्रपटाची संपूर्ण टीम हजर होती. सलमान खान आणि पूजा हेगडे या मुख्य कलाकारांशिवाय सिद्धार्थ निगम, जगपती बाबू, राघव जुयाल, पलक तिवारी, भूमिका चावला, शहनाज गिल हे सर्व कलाकार मंचावर उपस्थित होते. ट्रेलर लाँच झाल्यानंतर या कलाकारांचे पडद्यामागील किस्से आणि काही सिक्रेट्ससुद्धा प्रेक्षकांसमोर आले.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शहनाज गिल आणि राघव जुयाल या दोघांच्या रिलेशनशिपबाबत चर्चा होत्या. मात्र या स्टोरीला सलमानने वेगळाच ट्विस्ट दिला आहे. ट्रेलर लाँचिंगच्या कार्यक्रमात राघव जुयाल हा सलमानचं तोंडभरून कौतुक करत होता. त्याचप्रमाणे त्याने चित्रपटात काम करण्याची संधी दिल्याबद्दल ‘भाईजान’चे आभार मानले. त्याचवेळी सलमानने राघवच्या खासगी आयुष्याबद्दल पोलखोल केली.

हे सुद्धा वाचा

सलमान म्हणाला, “या चित्रपटादरम्यान मला एक केमिस्ट्री पहायला मिळाली. मात्र त्याला कोणीच पुढे नेण्याचा प्रयत्न करत नव्हता. सिद्धार्थ (निगम) भावा, तू तरी बोल. तू सुद्धा पाहिलं की नाही? कोणीच एक पाऊल पुढे नेत नाही. जर एखाद्याने प्रयत्न केला तर दुसरी व्यक्ती एक पाऊल मागे जायची. ही पलक का?”

हे सर्व ऐकून पलक तिवारी फक्त तिची मान हलवते आणि सलमानला त्याविषयी काहीच न बोलण्यास सांगते. तेव्हा राघव म्हणतो की, “ते प्रेम आणि काम काय, ज्याची चर्चाच होणार नाही.” पुन्हा यावर सलमान म्हणतो, “पलक ही खूप चांगली गोष्ट आहे. शहनाज तू आता मूव्ह ऑन झाली पाहिजेस. कारण मला असं वाटतं आणि मी प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहतो.”

पलक तिवारी ही प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे. पलकने याआधी सलमानच्या ‘अंतिम’ चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. आता ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात ती भूमिका साकारतेय. सलमानच्या वक्तव्यानंतर राघव आणि पलक यांच्यात काहीतरी शिजत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केलं आहे. यामध्ये सलमान खान, पूजा हेगडे, शहनाज दिल, डग्गुबती व्यंकटेश, पलक तिवारी, भूमिका चावला, राघव जुयाल यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 21 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.