AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rashmika Mandanna | या अभिनेत्यावर जडला ‘नॅशनल क्रश’चा जीव; लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये रश्मिका?

नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. या फोटोवरून ती एका अभिनेत्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.

Rashmika Mandanna | या अभिनेत्यावर जडला 'नॅशनल क्रश'चा जीव; लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये रश्मिका?
Rashmika MandannaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 06, 2023 | 8:03 PM

हैदराबाद | 6 सप्टेंबर 2023 : ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. रश्मिकाच्या साखरपुड्याविषयी आणि लग्नाविषयी विविध अंदाज वर्तवले जातात. इतकंच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडासोबत अनेकदा तिचं नाव जोडलं जातं. मात्र या दोघांनी कधीच त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. आता रश्मिकाच्या एका फोटोमुळे पुन्हा एकदा तिच्या रिलेशनशिपची चर्चा होऊ लागली आहे. रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवरून ती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचा अंदाज चाहते वर्तवत आहेत. इतकंच नव्हे तर ती कोणत्या अभिनेत्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहतेय, याचाही अंदाज चाहत्यांनी लावला आहे.

एका फोटोवरून चर्चांना उधाण

रश्मिकाने नुकतीच तिच्या एका खास मैत्रिणीच्या लग्नाला हजेरी लावली होती. या लग्नातील फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. त्यापाठोपाठ तिने आणखी दोन फोटो पोस्ट केले आहेत. या दोन्ही फोटोमागील जागा पाहून नेटकऱ्यांनी असा अंदाज लावला आहे की विजय देवरकोंडासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. यामागचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी विजयनेही त्याच जागेवरील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. म्हणूनच रश्मिकाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

हे सुद्धा वाचा

लग्नाबद्दल विजयची प्रतिक्रिया

‘मी तर कधीपासून म्हणतोय की हे दोघं जवळपास 3-4 वर्षांपासून एकत्र राहतायत’, असं एकाने म्हटलंय. तर ‘या दोघांनी साखरपुडासुद्धा केला असेल. यात कितपत सत्य आहे माहीत नाही’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विजयला लग्नाबद्दल प्रश्न विचारला असता त्यानेही सकारात्मक उत्तर दिलं. “मला लवकरच लग्न करण्याची गरज आहे. कदाचित ती वेळ जवळ आली आहे. पण सध्या मला त्याबद्दल बोलण्यातही मजा येते. मला लग्नाबद्दल बोलायला आवडतंय. आयुष्यातील हा एक असा टप्पा आहे, जो प्रत्येकाने अनुभवला पाहिजे. पुढील दोन-तीन वर्षांत मी लग्न करेन. अजून तरी मी योग्य मुलीच्या शोधातच आहे”, असं तो म्हणाला होता.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.