‘बिग बॉस 17’मधील अभिनेत्रीची आई करणार कायदेशीर कारवाई? मुलीच्या चारित्र्याबाबत..

'उडारिया' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ईशा मालवीय ही अभिषेक कुमारला डेट करत होता. मात्र त्याच्यावर काही आरोप करत ईशाने ब्रेकअप केला होता. ब्रेकअपनंतर अभिषेकच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाला होता आणि त्यामुळे तो उपचारसुद्धा घेत होता.

'बिग बॉस 17'मधील अभिनेत्रीची आई करणार कायदेशीर कारवाई? मुलीच्या चारित्र्याबाबत..
bigg boss 17 Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 2:54 PM

मुंबई : 4 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस 17’च्या घरात अभिषेक कुमार आणि समर्थ जुरैल यांच्यात जोरदार भांडण झाल्याचं पहायला मिळालं. हे भांडण फक्त शाब्दिक नव्हतं तर अभिषेकने थेट समर्थच्या कानशिलात लगावलं. त्यावरून आता सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. काम्या पंजाबी, रितेश देशमुख, प्रिन्स नरुला यांसारख्या सेलिब्रिटींनी अभिषेकचं समर्थन केलं आहे. तर दुसरीकडे ईशा मालवीयच्या आईने सोशल मीडियावर पोस्ट लिहित अभिषेक कुमारला सुनावलं आहे. इतकंच नव्हे तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.

ईशा मालवीयच्या आईची पोस्ट-

‘या मुलाने प्रत्येकवेळी अत्यंत निर्दयीपणे ईशाच्या चारित्र्यावर टिप्पणी केली आहे. त्याने मलाही सोडलं नाही. हा खेळ मानसिक क्षमतेचा आहे. जर हा इतका मानसिकदृष्ट्या इतका त्रस्त होता तर ईशा बिग बॉसच्या घरात येणार हे माहीत असतानाही सहभाग का घेतला? अशा हरकतींवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. आतापण आम्ही फक्त ईशासाठी गप्प आहोत. प्रत्येकवेळी ईशाला मधे आणल्याबद्दल तुला लाज वाटली पाहिजे आणि जे लोक त्याच्या हिंसक स्वभावाचं समर्थन करतायत, त्यांनाही लाज वाटली पाहिजे’, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

बिग बॉसच्या आगामी एपिसोडच्या प्रोमोमध्ये दाखवलंय की ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल हे अभिषेकच्या मानसिक स्वास्थावरून त्याची खिल्ली उडवतात. ईशा अभिषेकला ‘मेंटल भोपू’ म्हणून चिडवते. त्यावर अभिषेक तिला उत्तर देतो, “तुझ्या प्रेमातच मी वेडा होतो. तू मला वेडा करून सोडलंस.” हे भांडण इतक्यावरच थांबत नाही. ईशा ही अभिषेकच्या वडिलांवरून कमेंट करते. “तुझ्या वडिलांनाही माहीत आहे की तू लहानपणापासूनच वेडा आहेस. सर्वांना माहीत आहे की तू वेडा आहेस.” त्यानंतर अभिषेकसुद्धा ईशाच्या आईवरून कमेंट करतो. “तुझ्या आईलाही तुझे कारनामे माहीत आहेत. छी मुलगी.” त्यानंतर जेव्हा अभिषेक काही बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा समर्थ त्याच्या तोंडात कागदाचा बोळा टाकतो. अभिषेक तोंडातील तो बोळा फेकून देतो आणि समर्थच्या कानाखाली मारतो. हे पाहून घरातील सर्व स्पर्धकांना धक्का बसतो.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.