AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनन्यासोबतच्या ब्रेकअपबाबत अखेर इशान खट्टरने सोडलं मौन, म्हणाला..

'खाली पिली' या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. त्याआधी या दोघांनी डिनर डेटवर, पार्ट्यांना आणि मालदीव्सच्या व्हेकेशनला जाताना एकत्र पाहिलं गेलं होतं. मात्र रिलेशनशिपविषयी दोघांनी कधीच माध्यमांसमोर कबुली दिली नव्हती.

अनन्यासोबतच्या ब्रेकअपबाबत अखेर इशान खट्टरने सोडलं मौन, म्हणाला..
Ishaan Khatter and Ananya PandayImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 12:43 PM

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) आणि इशान खट्टर (Ishaan Khatter) यांच्या ब्रेकअपच्या (breakup) चर्चा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर होत्या. ‘खाली पिली’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. त्याआधी या दोघांना डिनर डेटवर, पार्ट्यांना आणि मालदीव्सच्या व्हेकेशनला एकत्र जाताना पाहिलं गेलं होतं. मात्र रिलेशनशिपविषयी दोघांनी कधीच माध्यमांसमोर कबुली दिली नव्हती. त्यामुळे ब्रेकअपच्या चर्चांवरही दोघांनी मौन बाळगलं होतं. अखेर ‘कॉफी विथ करण 7’ या चॅट शोमध्ये इशानने अनन्यासोबतच्या नात्यावर मौन सोडलं. अनन्या आणि इशान यांचं ब्रेकअप झाल्याचं सूत्रसंचालक करण जोहरनेही स्पष्ट केलं.

कॉफी विथ करणच्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये इशानने कतरिना कैफ आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत हजेरी लावली होती. ‘मी सिंगल आहे’ असं सिद्धांतने म्हणताच इशाननेही सिंगल असल्याचं स्पष्ट केलं. “मी इतका सिंगल आहे की माझ्यासोबत फिरता फिरता इशानसुद्धा सिंगल झालाय”, असं सिद्धांत म्हणाला. हे ऐकताच करण इशानकडे पाहून म्हणतो, ‘तुझंही अनन्यासोबत नुकतंच ब्रेकअप झालं’.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

ब्रेकअपबद्दल थेट न बोलता इशांत करणला म्हणतो, “खरंच का, कारण तूच आता म्हणालास की तिने माझ्यासोबत ब्रेकअप केलं.” कॉफी विथ करणच्या याआधीच्या एपिसोडमध्ये अनन्याने हजेरी लावली होती, तेव्हासुद्धा करणने तिला हाच प्रश्न विचारला होता. इशानसोबत डेट करत असताना तू विजय देवरकोंडासोबत बाहेर डिनर डेटला गेली असतीस का, असा प्रश्न करण अनन्याला विचारतो. त्यावर नकारार्थी उत्तर देत अनन्या म्हणाली, “आम्ही मित्र म्हणून बाहेर फिरायला गेलो होतो.”

अनन्याच्या या उत्तरावर प्रतिक्रिया देणं इशान टाळतो. कोणी कोणासोबत ब्रेकअप केलं हे महत्त्वाचं नसून मी आता सिंगल आहे, असंही त्याने स्पष्ट केलं. ब्रेकअपनंतर अनन्याशी मैत्री कायम आहे का असा प्रश्न विचारला असता तो पुढे म्हणाला, “अनन्या आयुष्यभरासाठी माझी मैत्रीण राहावी अशी माझी इच्छा आहे. ती खरंच खूप चांगली व्यक्ती आहे. ती नेहमीच माझ्या प्रिय व्यक्तींपैकी एक असेल.”

सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू.
Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?
Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?.
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार.
पाक लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे
पाक लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने; पदाची पाटी मात्र अद्याप तशीच
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने; पदाची पाटी मात्र अद्याप तशीच.
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!.
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य.