AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहिद कपूरचा भाऊ इन्स्टा लाइव्हनंतर कॅमेरा बंद करायला विसरला अन् झाली ‘ही’ मोठी चूक

इशान हा अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ आहे. त्याने मोजक्या चित्रपटांमध्ये काम केलं असून खासगी आयुष्यामुळे तो अनेकदा चर्चेत आला. अभिनेत्री अनन्या पांडेसोबत त्याचं नाव जोडण्यात आलं होतं. या दोघांना डिनर डेटवर, पार्ट्यांना आणि मालदीव्सच्या व्हेकेशनला एकत्र जाताना पाहिलं गेलं होतं.

शाहिद कपूरचा भाऊ इन्स्टा लाइव्हनंतर कॅमेरा बंद करायला विसरला अन् झाली 'ही' मोठी चूक
Shahid Kapoor and Ishaan KhatterImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 12:51 PM

मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : अभिनेता इशान खट्टर चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी इन्स्टाग्रामवर लाइव्ह आला होता. यावेळी त्याने फॉलोअर्सशी मनसोक्त गप्पा मारल्या. मात्र जेव्हा हा लाइव्ह संपला तेव्हा तो कॅमेरा बंद करण्यास विसरला. इशानची हीच चूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून त्याला नेटकरी ट्रोल करत आहेत. इन्स्टा लाइव्ह संपल्यानंतर इशान कॅमेरा बंद करायला विसरला आणि त्यादरम्यान त्याचा मित्रासोबतचा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा पब्लिसिटी स्टंट आहे, असंही काहींनी म्हटलंय.

लाइव्ह संपल्यानंतर इशान त्याच्या मित्रासोबत सहजपणे गप्पा मारत असतो. दुबईहून टीव्हीएसचं आमंत्रण आल्याचं तो मित्राला सांगतो. यावरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. हा पब्लिसिटी स्टंट असून त्यातही इशानने ‘बनावट अभिनय’ केल्याची टीका काहींनी केली आहे. ‘हे खरंतर प्रमोशनल आहे. इथेसुद्धा त्याने वाईट अभिनय केलं आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘कदाचित प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी त्यांनी हे सर्व केलं असावं. ब्रँडकडून ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी असेल’, असा अंदाज दुसऱ्या युजरने वर्तवला.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

इशान हा अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ आहे. त्याने मोजक्या चित्रपटांमध्ये काम केलं असून खासगी आयुष्यामुळे तो अनेकदा चर्चेत आला. अभिनेत्री अनन्या पांडेसोबत त्याचं नाव जोडण्यात आलं होतं. या दोघांना डिनर डेटवर, पार्ट्यांना आणि मालदीव्सच्या व्हेकेशनला एकत्र जाताना पाहिलं गेलं होतं. मात्र रिलेशनशिपविषयी दोघांनी कधीच माध्यमांसमोर कबुली दिली नव्हती. त्यामुळे ब्रेकअपच्या चर्चांवरही दोघांनी मौन बाळगलं होतं.

अखेर ‘कॉफी विथ करण 7’ या चॅट शोमध्ये इशानने सिंगल असल्याचं स्पष्ट केलं होतं. कॉफी विथ करणच्या एपिसोडमध्ये इशानने कतरिना कैफ आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत हजेरी लावली होती. ‘मी सिंगल आहे’ असं सिद्धांतने म्हणताच इशानसुद्धा सिंगल असल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं. “मी इतका सिंगल आहे की माझ्यासोबत फिरता फिरता इशानसुद्धा सिंगल झालाय”, असं सिद्धांत म्हणाला. हे ऐकताच करण इशानकडे पाहून म्हणतो, ‘तुझं अनन्यासोबत नुकतंच ब्रेकअप झालं?’ त्यावर ब्रेकअपबद्दल थेट न बोलता इशांत करणला म्हणतो, “खरंच का, कारण तूच आता म्हणालास की तिने माझ्यासोबत ब्रेकअप केलं.”

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.