Jaan Kumar Sanu Controversy | माझ्या मुलाने मराठी भाषेचा अपमान केलेला नाही, त्याला समजून घ्या, जानच्या आईची विनंती!

‘माझ्या मुलाने मराठी भाषेचा अपमान केलेला नाही. कृपया त्याला समजून घ्या’, अशी विनंतीही रिटा भट्टाचार्य यांनी केली आहे.

Jaan Kumar Sanu Controversy | माझ्या मुलाने मराठी भाषेचा अपमान केलेला नाही, त्याला समजून घ्या, जानच्या आईची विनंती!
1994 मध्ये वडील कुमार सानू आणि आई रीटा यांचा घटस्फोट झाला. जानच्या जन्मापूर्वीच या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा रीटा या सहा महिन्याच्या गर्भवती होत्या.
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 6:02 PM

मुंबई : ‘बिग बॉस 14’च्या घरात स्पर्धक असणाऱ्या गायक जान कुमार सानूने (Jaan Sanu) वादग्रस्त वक्तव्य करत एका नवीन वादाला निमंत्रण दिले आहे. ‘मराठीची चीड येते’ या विवादीत वक्तव्यानंतर जान सानू विरोधात संतापाची लाट उसळली होती. घडल्या प्रकारानंतर कलर्स वाहिनीसह जान कुमार सानूने देखील प्रेक्षकांची माफी मागितली होती. या प्रकरणावर आता जानची आई रिटा भट्टाचार्य (Rita Bhattacharya) यांनी प्रतिक्रिया देत आपल्या मुलाची बाजू घेतली आहे. (Jaan Sanu’s mother Rita Bhattacharya reacted on controversial statement)

‘माझ्या मुलाने मराठी भाषेचा अपमान केलेला नाही. कृपया त्याला समजून घ्या’, अशी विनंतीही रिटा भट्टाचार्य यांनी केली आहे.

जानला मराठी येत नाही : रिटा भट्टाचार्य

जानची आई रिटा भट्टाचार्य यांनी एका वेबसाईटला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. मुलाचा बचाव करत रिटा म्हणाल्या, ‘राहुल आणि निक्की कार्यक्रमात मराठीत बोलत होते. जानला मराठी येत नसल्याने ते दोघे काय बोलत होते हे त्याला समजले नाही. त्यामुळे त्याने निक्कीला, तू मराठीत बोलू नको, असे सांगितले. कारण, राहुल-निक्की त्याच्याविरूद्ध बोलत आहेत, असे जानला वाटले.’

‘लोकांनी परिस्थिती समजून घ्यावी आणि नंतर निर्णयावर यावे, अशी माझी इच्छा आहे. आम्ही महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा अपमान कसा करू शकतो? आम्ही गेल्या 35 वर्षांपासून महाराष्ट्रात राहत आहोत. या राज्याने जानचे वडील कुमार सानू यांना खूप प्रेम आणि आदर दिला आहे. मात्र, आता निर्माण झालेल्या या वादामुळे मी आणि माझे कुटुंबीय प्रचंड तणावात आहे’, असे त्या म्हणाल्या.(Jaan Sanu’s mother Rita Bhattacharya reacted on controversial statement)

आंतरराष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम असल्याने हिंदीचा वापर व्हावा!

‘बिग बॉस हा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसारित होणारा कार्यक्रम आहे. म्हणूनच, जर स्पर्धक हिंदीमध्ये बोलले नाहीत तर, कोणालाही काही समजणार नाही. म्हणूनच निर्माते त्यांना सतत हिंदीमध्ये बोलण्यास सांगत असतात. जानने जर असे बोलला तर त्यात वाद कसा उद्भवला हे मला समजत नाही. आम्ही भारतीय आहोत आणि आमचे महाराष्ट्रावर प्रेम आहे. शिवाय ठाकरे कुटुंब मला चांगले परिचित आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मला बरीच मदत केली होती. तर, मग आम्ही हे राज्य आणि भाषा कशी नाकारू शकतो? मी हात जोडून सर्वांना विनंती करते की, या गोष्टीत वाद निर्माण करू नका आणि माझ्या मुलाला एकटे सोडा’, असे रिटा भट्टाचार्य म्हणाल्या. (Jaan Sanu’s mother Rita Bhattacharya reacted on controversial statement)

काय आहे प्रकरण?

‘बिग बॉस’च्या (Bigg Boss 14) खेळादरम्यान झालेल्या वादात जान कुमार सानूने निक्की तंबोलीशी बोलताना मराठी भाषेची चीड येत असल्याचे म्हटले होते. ‘बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्या दरम्यान घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे. राहुलशी ती मराठीत संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसत असते. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला होता.

(Jaan Sanu’s mother Rita Bhattacharya reacted on controversial statement)

संबंधित बातम्या : 

एक बाप म्हणून माफी मागतो, आईने काय शिक्षण दिलं माहिती नाही, मुलगा 27 वर्षांपासून माझ्यासोबत नाही : गायक कुमार सानू

‘मुंबईत राहून तुझ करिअर कसं बनतं तेच बघतो..’ अमेय खोपकरांचा ‘बिग बॉस’ स्पर्धकाला इशारा!

जान कुमार सानूला ‘बिग बॉस’मधून हाकला, अन्यथा कार्यक्रम चालू देणार नाही! : प्रताप सरनाईक

‘मराठी भाषिकांची मनापासून माफी मागतो’, मनसे-शिवसेनेच्या दणक्यानंतर जान कुमार सानूची माफी

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.