AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेम करावं तर जॉकी श्रॉफ याच्यासारखं, बसमध्ये बसलेल्या १३ वर्षीय मुलीला पहिल्यांदा पाहिलं आणि….

बसमधून सुरु झाली जॉकी श्रॉफ याची लव्हस्टोरी... श्रीमंत घरातली मुलगी तर, चाळीत राहणारा जॉकी... अनेक अडचणींचा सामना करत फक्त दिलं प्रेमाला महत्त्व

प्रेम करावं तर जॉकी श्रॉफ याच्यासारखं, बसमध्ये बसलेल्या १३ वर्षीय मुलीला पहिल्यांदा पाहिलं आणि....
jackie shroff and ayesha shroff love story
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 10:17 AM

Jackie Shroff and Ayesha Shroff Love Story : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींची ‘लव्हस्टोरी’ एखाद्या सिनेमातील कथेसारखी आहे. अशाच ‘लव्हस्टोरी’ पैकी एक म्हणजे अभिनेता जॉकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि पत्नी आयशा श्रॉफ (jackie shroff) यांची. जॉकी आयशा यांच्या पहिल्या नजरेतच प्रेमात पडले. १३ वर्षांच्या मुलीला बसमधून जाताना जॉकी श्रॉफ याने पाहिलं आणि त्याच बसमधून दोघांची लव्हस्टोरीची सुरुवात झाली. बसमध्ये त्या १३ वर्षांच्या मुलीला पाहिल्यानंतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता जॉकी त्या मुलीकडे गेला आणि तिच्यासोबत अनेक गप्पा मारल्या. स्वतःची ओळख करुन दिली. पहिल्या भेटीच दोघांमध्ये अनेक गप्पा रंगल्या.

पण आपलं प्रेम मिळवणं जॉकीसाठी इतकं सोपं नव्हतं. ज्या मुलीवर जॉकी श्रॉफ प्रचंड प्रेम करत होता, ती मुलही आयशा दत्त प्रचंड श्रीमंत घरातील होती आणि जॉकी चाळीत राहायचा. पण पत्नी म्हणून आयशाच हवी अशी जिद्द जॉकीच्या मनात होती. इच्छा होती म्हणून दोघांची भेट पुन्हा झाली. बसमध्ये पहिली भेट झाल्यानंतर आयशा आणि जॉकी यांची दुसरी भेट एक रेकॉर्डिंग स्टुडियोमध्ये झाली. आयशा स्टुडिओमध्ये काही रेकॉर्डिंग घेण्यासाठी आल्या होत्या. त्यासाठी जॉकीने आयशा यांची मदत केली. (jackie shroff and ayesha shroff love story)

View this post on Instagram

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu)

दोन भेटीनंतर आयशा देखील जॉकीच्या प्रेमात पडल्या. तेव्हा आयशा यांनी देखील ठरवलं की लग्न करणार तर जॉकी सोबतच. दोघे वेगळ्या कुटुंबातील होते, संस्कार वेगळे होते. पण दोघांच्या मनात फक्त आणि फक्त प्रेमाची भावना होती. पण त्यांचं नातं आयशा यांच्या आईला मान्य नव्हतं. सर्व काही अगदी मस्त सुरु होतं. पण लव्हस्टोरीमध्ये अडचणी नसतील, तर ती स्टोरी लव्हस्टोरी नसते… (bollywood love)

जॉकी एक गोष्ट कायम आयशापासून लपवत होते. पण अखेर एक दिवस आला आणि त्यांनी सर्वकाही आयशा यांना सांगितलं. जॉकी यांची एक गर्लफ्रेंड होती आणि ती अमेरिकेत शिक्षण घेत होती. अमेरिकेतून आल्यानंतर जॉकी आणि गर्लफ्रेंड लग्न करणार होते… हे कळाल्यानंतर आयशा यांना मोठा धक्का बसला. तेव्हा आयशा यांनी जॉकी यांना एक बहीण म्हणून कायम जॉकी याच्यासोबत राहणार असं सांगितलं. पण जॉकी यांच्या मनात तर आयशा होत्या.

अखेर अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आयशा यांनी वाढदिवसाचं निमित्त साधत जॉकी याच्यासोबत लग्न केलं. भव्य घर, सुखी आयुष्याचा त्याग करत आयशा जॉकीसोबत चाळीत येवून राहू लागल्या. दोघांनी ५ जून १९८७ मध्ये लग्न केलं आणि स्वतःची लव्हस्टोरी पूर्ण केली. लग्नानंतर दोघांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण दोघांनी कधीही एकमेकांची साथ सोडली नाही. आज त्यांना दोन मुलं आहेत. एक टायगर श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ दोघेही त्यांच्या क्षेत्रात यशस्वी आहेत. (affairs relationships)

20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.