Jackie Shroff | जॅकी श्रॉफ यांच्या डाळीत माशी; प्रश्न विचारताच युजरला दिलं ‘हे’ उत्तर

अभिनेते जॅकी श्रॉफ यांना स्वयंपाकाची फार आवड आहे. त्यांचे हटके रेसिपी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. निसर्गाच्या सानिध्यात राहून पौष्टिक अन्नाचा आस्वाद घ्यायला त्यांना फार आवडतं. नुकताच त्यांनी शेतातील एक व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Jackie Shroff | जॅकी श्रॉफ यांच्या डाळीत माशी; प्रश्न विचारताच युजरला दिलं 'हे' उत्तर
Jackie ShroffImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 27, 2023 | 7:55 PM

मुंबई | 27 सप्टेंबर 2023 : अभिनेते जॅकी श्रॉफ हे त्यांच्या चित्रपटांसोबतच खास रेसिपींमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. जॅकी श्रॉफ यांच्या हटके स्टाइलची रेसिपी सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल होते. इतकंच नव्हे तर त्यांचे हे खास रेसिपीज नेटकरी स्वतः बनवून पाहतात आणि त्यानंतर त्यांना टॅग करून व्हिडिओसुद्धा शेअर करतात. अंड्याची रेसिपी, देशी वांगं आणि आता त्यांच्याच हटके स्टाइलची भेंडीची भाजी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. केवळ भारतातच नाही तर परदेशातही अनेकांनी जॅकी श्रॉफ यांची हटके रेसिपी स्वतः बनवून पाहिली आणि त्यानंतर त्याची चव चाखून जॅकी यांचं कौतुक केलं. सध्या सोशल मीडियावर त्यांचा असाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.

डाळीत माशी

सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये जॅकी श्रॉफ त्यांच्यासमोरील जेवणाचं ताट दाखवत आहेत. त्यांच्या ताटात दोन प्रकारच्या भाज्या आणि डाळ दिसून येत आहे. ‘शेतातून थेट टेबलावर…आपल्या जमिनीशी टिकून राहणं आणि स्वस्थ राहणं हा एकमेव मार्ग आहे. रेसिपी पाहिजे असेल तर सांगा भिडू,’ असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला. मात्र या व्हिडिओतील एका गोष्टीकडे युजरचं लक्ष वेधलं गेलं. जॅकी श्रॉफ यांच्या ताटातील डाळीमध्ये माशी पडल्याचं त्याने म्हटलंय. युजरच्या या कमेंटनंतर अनेकांच्या ती गोष्ट निदर्शनास आली. डाळीत माशी आहे हे फक्त मलाच दिसतंय का असा सवाल संबंधित युजरने कमेंटमध्ये केला होता. त्यावर आता जॅकी श्रॉफ यांनी स्वतः त्या युजरला उत्तर दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu)

जॅकी श्रॉफ यांनी संबंधित युजरला कमेंट करत लिहिलं, ‘भिडू मी जंगलात बसलोय.’ जॅकी यांच्या या व्हिडिओवर अभिनेते सुनील शेट्टीयांनी सुद्धा कमेंट केली. कमेंट बॉक्समध्ये त्यांनी ‘दादा’ असं लिहून हृदयाचे इमोजी पोस्ट केले. अनेकांनी जॅकी श्रॉफ यांच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तुम्ही तुमचा वेगळा रेसिपीचा शो सुरु करा, असाही सल्ला अनेकांनी या कमेंट बॉक्समध्ये दिला. इतकंच नव्हे तर ‘भिडू का जादू’, ‘जॅकी का जलवा’ अशी नावंसुद्धा काही युजर्सनी त्यांच्या फूड शोसाठी सुचवली आहेत.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.