भिडू बोले तो साफसफाई मस्त रखने का… जॅकी श्रॉफचा मंदिराच्या पायऱ्या साफ करतानाचा व्हिडीओ तूफान व्हायरल…
जॅकी श्रॉफ हे कायमच चर्चेत असतात. जॅकी श्रॉफ यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. जॅकी श्रॉफ हे सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय दिसतात. नुकताच जॅकी श्रॉफ यांचा एक अत्यंत खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
मुंबई : अभिनेते जॅकी श्रॉफ हे कायमच चर्चेत असतात. जॅकी श्रॉफ यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका या केल्या आहेत. जॅकी श्रॉफ हे सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय दिसतात. जॅकी श्रॉफ यांचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर कायमच व्हायरल होताना दिसतात. सध्या एका व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे जॅकी श्रॉफ हे चर्चेत आहेत.
जॅकी श्रॉफ यांचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून लोक हे जॅकी श्रॉफ यांचे जोरदार काैतुक करताना दिसत आहेत. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये जॅकी श्रॉफ हे साफसफाई करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये जॅकी श्रॉफ हे चक्क पायऱ्या साफ करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या आजुबाजूला खूप लोक दिसत आहेत.
हा व्हिडीओ पाहून अनेकांना प्रश्न पडलाय की, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि जॅकी श्रॉफ कुठे साफसफाई करत आहेत. जॅकी श्रॉफ यांचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका मंदिरातील आहे. मंदिराच्या पायऱ्या या साफ करताना जॅकी श्रॉफ हे दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक त्यांचे काैतुक करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
जॅकी श्रॉफ यांना 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आमंत्रित करण्यात आलंय. यानंतर जॅकी श्रॉफ यांनी आनंद व्यक्त केलाय. जॅकी श्रॉफ हे कायमच चर्चेत असतात. जॅकी श्रॉफ हे सामाजिक कामे करताना नेहमीच दिसतात. नेमक्या कोणत्या मंदिराची साफसफाई जॅकी श्रॉफ हे करत आहेत, हे अजूनही कळू शकले नाहीये.
जॅकी श्रॉफ यांच्या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, खरोखरच जॅकी श्रॉफ यांना माहिती आहे की, एक रिअल हिरो नेमका कसा असतो ते. दुसऱ्याने लिहिले की, खरोखरच हे खूप जास्त मेहनती व्यक्ती आहेत. तिसऱ्याने लिहिले की, खरोखरच जॅकी श्रॉफ यांच्याकडून इतर बाॅलिवूड कलाकारांनी प्रेरणा घेतली पाहिजे.