‘त्या गुंड सुकेशपेक्षा तुझा बॉडीगार्ड चांगला दिसतो’, व्हायरल व्हिडीओनंतर नेटकऱ्यांकडून जॅकलिन ट्रोल

जॅकलिनचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत जॅकलिनचा बॉडीगार्ड तिच्या मागे दिसत आहे. सुकेशची तुलना तिच्या बॉडीगार्डशी करत, 'त्या गुंड सुकेशपेक्षा तुझा बॉडीगार्ड चांगला दिसतोय', अशा तिरकस कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

'त्या गुंड सुकेशपेक्षा तुझा बॉडीगार्ड चांगला दिसतो', व्हायरल व्हिडीओनंतर नेटकऱ्यांकडून जॅकलिन ट्रोल
Jacquline
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 4:57 PM

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) काही दिवसांपासून भलतीच चर्चेत आहे. तिचा नवीन चित्रपट आल्यावरही ती एवढी कधी चर्चेत आली नसेल एवढी तिने सध्या टीव्हीची स्क्रीन व्यापलीय, त्याचं कारण आहे, गुंड सुकेश चंद्रशेखरसोबत तिचे व्हायरल झालेले फोटो…! हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतायत. या फोटोत जॅकलिन सुकेशसाठी पोज देताना दिसत आहे.

दुसरीकडे, जॅकलिनचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत जॅकलिनचा बॉडीगार्ड तिच्या मागे दिसत आहे. सुकेशची तुलना तिच्या बॉडीगार्डशी करत, ‘त्या गुंड सुकेशपेक्षा तुझा बॉडीगार्ड चांगला दिसतोय’, अशा तिरकस कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. viral bhayani या पेजवर जॅकलिनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत जॅकलिनने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला असून तिचे बॉडीगार्ड आजूबाजूला दिसत आहेत. तर काही कॅमेरामनही तिच्या अदा टिपण्यासाठी धडपडताना दिसून येत आहेत.

जॅकलिन फर्नांडिसचा व्हिडिओ पाहून यूजर्सच्या तिरकस कमेंट

जॅकलिनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स जॅकलिनला डिवचताना दिसत आहेत. तुझा बॉडीगार्ड सुकेश चंद्रशेखरपेक्षा चांगला दिसतो, अशा आशयाच्या शेकडो कमेंट नेटकऱ्यांनी जॅकलिनच्या व्हिडीओवर केल्या आहेत.

सुकेशने जॅकलिनला आतापर्यंत कोणकोणत्या भेटवस्तू दिल्या?

सुकेश चंद्रशेखरने कथितरित्या जॅकलिनला अनेक लक्झरी भेटवस्तू दिल्या आहेत. ज्यात जिम वेअरसाठी गुच्ची आउटफिट्स, गुच्ची शूज, रोलेक्स घड्याळ, 15 जोड्या महागडे कानातले, 5 बिर्किन बॅग, हर्मीस ब्रेसलेट आणि एलव्ही बॅग यांचा समावेश होता. या प्रकरणात दाखल झालेल्या आरोपपत्रानुसार त्याने जॅकलिनला एक मिनी कूपर गाडीही दिली होती, जी तिने परत केली. जॅकलिनची अमेरिकेत राहणारी बहीण गेराल्डिन फर्नांडिस हिलाही त्याने बीएमडब्ल्यू कार भेट दिल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपपत्रानुसार त्याने जॅकलिनच्या आईला एक पोर्चे कार देखील दिली.

सुकेश चंद्रशेखर कोण आहे?

200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरचे (Sukesh Chandrasekhar) बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतचे कनेक्शनही समोर येत आहे. आतापर्यंत या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्या नावानंतर आणखी अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सांगितले की, त्याचे श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टीसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींशीही संबंध आहेत.

2020च्या सुरुवातीला, जेव्हा सुकेश तुरुंगात होता, तेव्हा जवळपास 8 ते 10 बॉलिवूड सेलिब्रिटी त्याला भेटायला गेले होते, अशी माहिती आहे. मात्र, त्याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.

संबंधित बातम्या

viral video: अभिनेत्री रेश्मा शिंदेचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

Birthday Special : रामायणाची जादू, प्रभू रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल दिसताक्षणी लोक पाया पडायचे!

छोटी परी, सगळ्यांवर भारी, तिच्या तालावर नाचते दुनिया सारी

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....