Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tunisha Sharma Case: तुरुंगात असलेल्या शिझान खानच्या ‘या’ मागण्या न्यायालयाकडून होणार पूर्ण

तुनिशा आत्महत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या शिझान खानच्या 'या' मागण्या न्यायालयाकडून होणार पूर्ण

Tunisha Sharma Case: तुरुंगात असलेल्या शिझान खानच्या 'या' मागण्या न्यायालयाकडून होणार पूर्ण
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 5:45 PM

Tunisha Sharma Case: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा अत्महत्या प्रकरणी अभिनेता आणि एक्स बॉयफ्रेंड शिझान खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिझानच्या वकिलांनी न्यायालयाकडे अभिनेत्याचे केस न कापण्याची विनंती केली होती. याशिवाय, शिझानला तुरुंगात सुरक्षा आणि वैद्यकीय समुपदेशनाची मागणी करण्यात आली होती. मंगळवारी न्यायालयाने शिझान खान याने केलेल्या मागण्या पूर्ण केल्या आहेत.

न्यायालयाच्या निर्णयानंतर शिझानचे केस कापले जाणार नाहीत. आता तुनिशा हत्या प्रकरणात शिझानच्य जामिनावर सुनावणी ७ जानेवारीला होणार आहे. म्हणून तुनिषा आत्महत्या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिझानला दिलासा मिळेल का? हे ७ जानेवारीलाच कळेल.

टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने २४ डिसेंबर २०२२ रोजी आत्महत्या केली. अभिनेत्रीने बॉयफ्रेंडच्या मेकअप रुममध्ये गळफास लावत आत्महत्या केल्यामुळे अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. तुनिशा आत्महत्ये प्रकरणी अभिनेता आणि एक्स बॉयफ्रेंड शिझान खानला अटक करण्यात आली आहे.

तुनिशाच्या आईने अभिनेत्याने गंभीर आरोप केले आहेत. ज्यामुळे अभिनेत्याच्या अडचणीत वाढ होत आहे. तुनिशाच्या आईने शिझानवर आरोप केल्यानंतर शिझानच्या वकिलांनी देखील अभिनेत्रीच्या आईवर गंभीर आरोप केले आहेत.

शिझानच्या वकिलांनी तुनिशाच्या आईवर केले गंभीर आरोप पत्रकार परिषदेत शिझानचे वकील म्हणाले, ‘तुनिशाच्या आईने तिचा गळा दाबला होता. तुनिशा ज्या मालिकेमध्ये काम करत होती, त्या मालिकेच्या दिग्दर्शकांना देखील अभिनेत्रीने हा प्रकार सांगितला होता.’ एवढंच नाही, तर तुनिशाला तिने मेहनतीने कमावलेले पैसे देखील आईकडून सतत मागावे लागत होते… असं देखील शिझानचे वकील पत्रकार परिषदेत म्हणाले.

बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.