Jailer : रजनीकांत यांच्या ‘जेलर’मधील अभिनेत्याला ‘या’ कारणामुळे अटक

सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'जेलर' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला. यामध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता विनायकन विशेष चर्चेत आला होता. नुकतीच त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. नेमकं काय घडलं, ते सविस्तर वाचा..

Jailer : रजनीकांत यांच्या 'जेलर'मधील अभिनेत्याला 'या' कारणामुळे अटक
Malayalam actor VinayakanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 25, 2023 | 10:03 AM

कोची : 25 ऑक्टोबर 2023 | रजनीकांत यांच्या ‘जेलर’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता विनायकन याला मंगळवारी पोलिसांनी अटक केली होती. मद्यधुंद अवस्थेत पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ निर्माण करणे आणि पोलीस स्टेशनच्या कामकाजात अडथळा आणणे या आरोपांखाली एर्नाकुलम उत्तर पोलिसांनी त्याला अटक केली होती.

नेमकं काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, विनायकन राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये गोंधळ निर्माण केल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर चौकशीसाठी त्याला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आल होतं. विनायकनने असभ्य वर्तन केल्यामुळे त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. तो मद्यधुंद अवस्थेत होता असंही आम्हाला समजलं, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

‘जेलर’मुळे प्रसिद्धी

रजनीकांत यांच्या ‘जेलर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात रजनीकांत यांचा दमदार अभिनय आणि ॲक्शन पाहायला मिळाला. तर दुसरीकडे खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या विनायकनने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं. विनायकन याने चित्रपटात वर्मन या खलनायकाची भूमिका साकारली होती. ज्या पद्धतीने विनायकन याने वर्मनची भूमिका साकारली, त्यामुळे त्याला देशभरात प्रसिद्धी मिळाली. विनायकन हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे.

हे सुद्धा वाचा

विनायकनचं करिअर

विनायकन हा केवळ अभिनेताच नाही तर तो संगीतकार आणि पार्श्वगायकसुद्धा आहे. त्याने मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलंय. 1995 मध्ये मात्रिकम या चित्रपटातून त्याने करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. मात्र 2016 मध्ये ‘कमातीपद्म’ या चित्रपटातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्याला केरळ स्टेट फिल्म अवॉर्ड मिळाला. हा अवॉर्ड त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या विभागात मिळाला. त्याने या चित्रपटातील एक गाणंसुद्धा संगीतबद्ध केलं होतं. 2016 मधल्या या चित्रपटामुळे त्याला इंडस्ट्रीत खरी ओळख मिळाली. त्यानंतर रजनीकांत यांच्या जेलर या चित्रपटाने त्याच्या करिअरची दिशा आणि दशा बदलली.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.