माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाशी लग्न करणार? प्रश्न ऐकताच जान्हवीने थेट दिली अशी प्रतिक्रिया

शिखर पहाडिया हा स्मृती शिंदे यांचा मुलगा आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा नातू आहे. स्मृती शिंदे या सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. जान्हवी आणि शिखर यांचं एकाच शाळेत शिक्षण झालं आहे.

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाशी लग्न करणार? प्रश्न ऐकताच जान्हवीने थेट दिली अशी प्रतिक्रिया
Janhvi Kapoor and Shikhar Pahariya Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 16, 2024 | 10:19 AM

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडिया यांचं नातं आता जगजाहीर आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यात सर्वाधिक चर्चा याच जोडीची झाली. विविध कार्यक्रमांमध्ये जान्हवीने शिखरविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. इतकंच काय तर गळ्यात ‘शिखू’ नावाचं लॉकेट घालूनही तिने प्रेमाची जाहीर कबुली दिली. आता नुकत्याच एका कार्यक्रमात जान्हवीला लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने दिलेल्या उत्तराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. जान्हवीने सोमवारी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली होती. ‘माझ्याकडे एक सिक्रेट आहे. तुमच्यासोबत ते सिक्रेट शेअर करण्यास मी उत्सुक आहे’, असं तिने म्हटलं होतं. हे सिक्रेट म्हणजेच शिखरसोबत लग्नाची बातमी असू शकते, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला.

जान्हवीचं हे सिक्रेट तिच्या आगामी चित्रपटाबद्दल होतं. ‘उलझ’ या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित झाला. याच ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात जान्हवीला तिच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला. पत्रकाराने जान्हवीला विचारलं, “जान्हवी, लग्नाची काही बातमी आहे का?” त्यावर चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आणून ती म्हणते, “तू वेडा आहेस का?” तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

बॉलिवूड पार्टी असो किंवा देवदर्शन, जान्हवी आणि शिखर हे अनेकदा एकमेकांसोबत दिसतात. हे दोघं एकत्र तिरुपती बालाजींच्या दर्शनालाही गेले होते. अनंत-राधिकाच्या रिसेप्शन पार्टीत जेव्हा जान्हवीने एण्ट्री केली, तेव्हा तिच्या मागे असलेल्या शिखरने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. जान्हवीने पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले, तेव्हा शिखर तिच्यासमोरून जातो. हे पाहून जान्हवीसुद्धा लाजते. अंबानींच्या कार्यक्रमात नंतर जान्हवी-शिखरने आणि तिची बहीण खुशी कपूरने बॉयफ्रेंड वेदांग रैनासोबत फोटोसाठी पोझ दिले होते. सोशल मीडियावर या दोघी बहिणी तुफान चर्चेत होत्या.

एका मुलाखतीत जान्हवी शिखरविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. “मी 15-16 वर्षांची असल्यापासून तो माझ्या आयुष्यात आहे. माझ्या मते माझी स्वप्नं ही नेहमीच त्याची स्वप्नं राहिली आहेत आणि त्याची स्वप्नं ही नेहमीच माझी आहेत. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. जणू आम्ही एकमेकांनाच लहानाचं मोठं केलंय, अशा पद्धतीने आम्ही एकमेकांची साथ देतो”, असं ती म्हणाली होती.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.