अली गोणी नाही तर, दुसऱ्याच व्यक्तीसोबत जास्मीन हिने उरकलं लग्न! व्हिडीओ व्हायरल
बॉयफ्रेंड अली गोणी याला सोडून जास्मिन भसीनने गुपचूप उरकलं लग्न? व्हिडीओ शेअर करत 'तो' म्हणाला , “शादी कर ली...”... व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर खळबळ
मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री जास्मिन भसीन सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. जस्मिनच्या चाहत्यांची संख्या फार मोठी असल्यामुळे अभिनेत्रीबद्दल कोणतीही गोष्ट चाहत्यांमध्ये तुफान रंगत असते. जास्मिनला बिग बॉस 14 मुळे अधिकाधिक प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर बिग बॉसच्या घरातच जास्मिन हिला तिच्या आयुष्यातील खास व्यक्ती भेटली. जास्मिनच्या आयुष्यातील खास व्यक्तीचं नाव आहे अभिनेता अली गोणी. शोमध्ये तिच्या आणि अभिनेता अली गोणीसोबत असलेल्या अफेअरची चर्चा रंगली. बिग बॉसच्या घरात दोघांचा खुल्लमखुल्ला रोमान्स तर पहायला मिळालाच. पण बिग बॉसनंतर देखील दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं.
पण आता जास्मिन हिने बॉयफ्रेंड अली गोणी याची साथ सोडून दुसऱ्याच व्यक्तीसोबत लग्न केल्याची चर्चा रंगत आहे. सध्या जास्मिन हिच्या लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये जास्मिन अली गोणी यांच्यासोबत नाही तर, गायिका नेहा कक्कर हिचा भाऊ आणि गायक टोनी कक्कर (Tony Kakkar) याच्यासोबत लग्न करताना दिसत आहे.
खुद्द टोनी कक्कर याने जास्मिन हिच्यासोबत लग्नाचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये ‘शादी कर ली…’ असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते दोघांना शुभेच्छा देत आहेत. पण टोनी आणि जास्मिन यांचं लग्न झालं नसून आगामी व्हिडीओ ‘शादी करोगी’ (Shadi Karogi Song) यासाठी जास्मिन ही नव्या नवरीच्या भूमिकेत दिसत आहे.
जास्मिन आणि अलीची भेट ही रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी 9’ या शोमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. सोशल मीडियावर हे दोघं एकमेकांविषयी खुलेपणाने प्रेम व्यक्त करताना दिसतात. नंतर बिग बॉसच्या घरातही या दोघांमधील खास बाँडींग पहायला मिळाली.
एवढंच नाही तर, जास्मिन आणि गोणी लग्नबंधनात कधी अडकणार असा प्रश्न देखील चाहते सतत दोघांना विचारत आसतात. यावर जास्मिन म्हणाली, ‘आम्ही सध्या एकमेकांच्या प्रेमात आहोत. सध्या आमची लग्नाची किंवा इतर कोणतीही मोठी योजना नाही. आम्हाला, अजून एकमेकांना समजून घ्यायचं आहे. त्यानंतर आम्ही लग्नाबद्दल विचार करू.’ त्यामुळे दोघांच्या लग्नासाठी चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.