‘अभिनेत्रीला प्रत्येक देशातील पुरुषांसोबत शारीरिक संबंध…’, जावेद अख्तर यांच्याकडून संताप व्यक्त
Javed Akhtar : बॉलिवूडचं मोठं सत्य जावेद अख्तर यांनी समोर आणलं... सिनेमा निर्माते आणि समाजाबद्दल जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य... इंडस्ट्रीमधील अभिनेत्रींबद्दल देखील जावेद अख्तर यांनी सोडलं मौन... सध्या सर्वत्र जावेद अख्तर यांच्या वक्तव्याची चर्चा..
मुंबई | 10 जानेवारी 2024 : बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय गीतकार जावेद अख्तर कायम त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. कोणताही संकोच न बाळगता जावेद अख्तर इंडस्ट्रीमधील अनेक गोष्टी स्पष्ट सांगत असतात. आता देखील जावेद अख्तर यांनी सिनेमा निर्माते, समाज आणि अभिनेत्रींबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी अभिनेता शाहरुख खान याच्या सिनेमावर संताप व्यक्त करत,अभिनेत्रींना मिळत असलेल्या भूमिकांवर मौन सोडलं आहे. यावेळी जावेद अख्तर यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेत्री श्रीदेवी यांच्या नावाचा देखील उल्लेख केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जावेद अख्तर यांची चर्चा रंगली आहे.
यावेळी जावेद अख्तर यांनी शाहरुख खान स्टारर ‘जब तक है जान’ सिनेमावर संताप व्यक्त केला, ज्यामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा एक डायलॉग आहे. अनुष्का म्हणते, लग्नाआधी प्रत्येक देशातील पुरुषासोबत मला शारीरिक संबंध ठेवायचे आहेत… यावर जावेद अख्तर म्हणाले, ‘दिग्दर्शकांना माहिती नाही सशक्त होणे याचा अर्थ काय असतो… यामुळेच अभिनेत्रींना अशा भूमिका मिळत आहेत..’
जावेद अख्तर म्हणाले, ‘माधुरी दीक्षित, श्रेदेवी… यांसारख्या कौशल्य असणाऱ्या अभिनेत्रींना कधीच चांगल्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली नाही. त्यांना कधीच चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत, ज्या ‘मदर इंडिया’, ‘बंदिनी’, ‘सुजाता’, ‘साहिब बिवी’, ‘गुलाम’ यांसारख्या सिनेमांप्रमाणे आयकॉनीक ठरतील.’
पुढे जावेद अख्तर म्हणाले, ‘आज दिग्दर्शक मोठ्या पडद्यावर महिलांना सशक्त दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना माहिती नाही की खरी सशक्त महिला कशी असते?’ अख्तर, यश चोप्रा यांच्या ‘जब तक है जान’ सिनेमाचं उदाहरण देत म्हणाले, ‘यश चोप्रा यांच्या सिनेमात अभिनेत्री म्हणते, ‘शादी के पहले मे पूरी दुनिका मे अलग – अगल एक्सेंट वाले मर्दो के साथ सोऊंगी…’ यावर अख्तर म्हणाले, ‘इतकी मेहनक करण्याची काहीही गरज नाही…’
‘सशक्त होण्यासाठी तुम्हाला इतकं हार्डवर्क करण्याची काहीही गरज नाही. आज कोणत्याही सिनेमात अभिनेता डान्स, ऍक्शन करतो तेव्हाच सिनेमा पूर्ण होतो. सिनेमात कोणताही कॉन्टेंट नसतो. लेखक, दिर्गर्शकांना माहिती नाही की कॉन्टेंट काय आहे आणि समाज देखील याबद्दल क्लियर नाही. ज्याप्रकारचा कॉन्टेंट प्रेक्षकांना आवडत आहे… तसेच सिनेमे तयार होत आहेत…’ असं देखील जावेद अख्तर म्हणाले…