AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jawan चित्रपटातील मोठा सरप्राइज उघड; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या खास भूमिकेवरून उचलला पडदा

मुंबई | 7 सप्टेंबर 2023 : शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड क्रेझ पहायला मिळतेय. इतकंच काय तर किंग खानचे चाहते ढोल-ताशे घेऊन थिएटरबाहेर जल्लोष साजरा करत आहेत. प्रमुख शहरांमधील ‘जवान’चे सुरुवातीचे शोज हाऊसफुल आहेत. यादरम्यान आता चित्रपटातील एक खास सरप्राइज उघड झाला आहे. शाहरुख […]

Jawan चित्रपटातील मोठा सरप्राइज उघड; 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या खास भूमिकेवरून उचलला पडदा
जवानImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 6:14 PM

मुंबई | 7 सप्टेंबर 2023 : शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड क्रेझ पहायला मिळतेय. इतकंच काय तर किंग खानचे चाहते ढोल-ताशे घेऊन थिएटरबाहेर जल्लोष साजरा करत आहेत. प्रमुख शहरांमधील ‘जवान’चे सुरुवातीचे शोज हाऊसफुल आहेत. यादरम्यान आता चित्रपटातील एक खास सरप्राइज उघड झाला आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’मध्ये एक मोठा अभिनेता पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा होती. या यादीत अल्लू अर्जुनपासून थलपती विजयपर्यंत अनेक सुपरस्टार्सची नावं घेतली जात होती. मात्र आता त्या नावावरून पडदा उचलण्यात आला आहे. चित्रपट पाहिलेल्यांनी हा सर्वांत मोठा स्पॉयलर सोशल मीडियावर उघड केला आहे.

अटली दिग्दर्शित जवान या चित्रपटात बॉलिवूडचा खलनायक म्हणजेच अभिनेता संजय दत्त पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. संजू बाबाची सरप्राइज एण्ट्री पाहून चाहते खुश झाले आहेत. ट्विटरवर नेटकरी त्याच्या भूमिकेचं तोंडभरून कौतुक करत आहेत. ‘केजीएफ 2’ हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर संजय दत्त सध्या दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकांच्या लोकप्रिय कलाकारांच्या यादीत सहभागी झाला आहे.

हे सुद्धा वाचा

पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून मिळणारा भरभरून प्रतिसाद पाहून शाहरुख खानसुद्धा भारावला आहे. त्याने ट्विट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘वॉव… यासाठी मला खास वेळ काढावाच लागला. मी माझ्या प्रत्येक फॅन क्लबचे आणि प्रेक्षकांचे आभार मानू इच्छितो, जे इतक्या उत्साहाने थिएटरमध्ये माझा चित्रपट पहायला गेले आहेत. मी खूप भारावून गेलो. नक्कीच मी या प्रेमाची परतफेड लवकराच लवकर करेन. माझ्यावर प्रेम केल्याबद्दल तुम्हालाही माझ्याकडून भरपूर प्रेम’, अशा शब्दांत शाहरुखने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

जवानने पहिल्याच दिवशी जगभरात 120 कोटी रुपयांची कमाई केली आहे, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत. शाहरुखने स्वत:च्याच चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. पठाण या चित्रपटाने पहिल्या दिवशी 57 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. कमाईचा हाच वेग कायम राहिला तर पहिल्याच आठवड्यात ‘जवान’ हा चित्रपट 300 कोटी रुपयांची कमाई करू शकेल.

पहलगाम हल्ल्यानंतरचा CCTV समोर, जीव मुठीत घेऊन पर्यटकांची धावाधाव अन्
पहलगाम हल्ल्यानंतरचा CCTV समोर, जीव मुठीत घेऊन पर्यटकांची धावाधाव अन्.
भाजप माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये राडा, तलवारी, रॉड अन्...
भाजप माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये राडा, तलवारी, रॉड अन्....
9 तारखेच्या आतच काम होणार तमाम? पाकिस्तानला PM मोदींचा मोठा इशारा काय?
9 तारखेच्या आतच काम होणार तमाम? पाकिस्तानला PM मोदींचा मोठा इशारा काय?.
HSC : ऑल द बेस्ट पोरांनो, बारावीचा आज निकाल, कुठे पाहता येणार रिझल्ट?
HSC : ऑल द बेस्ट पोरांनो, बारावीचा आज निकाल, कुठे पाहता येणार रिझल्ट?.
जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो व्हायरल
जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो व्हायरल.
भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली
भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली.
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू.
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप.
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?.
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली.